Jio Diwali Dhamaka Offer: दिवाळीनिमित्त युजर्सना खास भेट! तब्बल 1 वर्षासाठी JioAirfiber कनेक्शन मिळेल Free

Updated on 18-Sep-2024
HIGHLIGHTS

रिलायन्स Jio ने आपल्या ग्राहकांसाठी Diwali Dhamaka Offer जाहीर केली आहे.

ऑफरअंतर्गत ग्राहकांना तब्बल 1 वर्षासाठी मोफत JioAirFiber कनेक्शन मिळणार आहे.

ही ऑफर आज म्हणजेच 18 सप्टेंबरपासून लाइव्ह होणार आहे.

Jio Diwali Dhamaka Offer: रिलायन्स Jio ने आपल्या ग्राहकांसाठी Diwali Dhamaka Offer जाहीर केली आहे. या ऑफर अंतर्गत रिलायन्स डिजिटल स्टोअरमधून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना JioAirFiber चे कनेक्शन अगदी मोफत दिले जाणार आहे. JioAirFiber ही Jio कंपनीची फायबर सेवा आहे. ही कंपनीची वायरलेस ब्रॉडबँड सेवा आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता, रिलायन्स डिजिटलच्या खास दिवाळी धमाका ऑफरबद्दल सर्व तपशील जाणून घेऊयात-

Diwali Dhamaka Offer

वर सांगितल्याप्रमाणे, रिलायन्स डिजिटलने काल म्हणजेच मंगळवारी ‘Diwali Dhamaka’ ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना तब्बल 1 वर्षासाठी मोफत JioAirFiber कनेक्शन मिळणार आहे. ही ऑफर नवीन आणि विद्यमान JioFiber ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. ही ऑफर आज म्हणजेच 18 सप्टेंबरपासून लाइव्ह होणार आहे, जी 3 नोव्हेंबरपर्यंत लाईव्ह असणार आहे. एवढेच नाही तर, या ऑफरअंतर्गत रिलायन्स डिजिटल स्टोअर्समधून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना खास गिफ्ट्स देखील दिले जाणार आहेत.

ऑफरचे सविस्तर तपशील

दिवाळी धमाका ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना रिलायन्स डिजिटल स्टोअरमधून खरेदी करणे आवश्यक आहे. तुम्हाला रिलायन्स डिजिटल स्टोअरमधून 20,000 रुपये किंवा त्याहून अधिक किमतीची खरेदी करावी लागेल. यानंतर, ऑफरअंतर्गत तुम्हाला नवीन Jio AirFiber कनेक्शन दिले जाईल. ज्यासह 2,222 रुपयांचा दिवाळी प्लॅन 3 महिन्यांसाठी ऍक्टिव्ह असेल. एवढेच नाही तर, विद्यमान Airfibre ग्राहकांना 1 महिन्याचा अतिरिक्त रिचार्ज मिळणार आहे.

कशी मिळेल ऑफर?

दिवाळी धमाका ऑफरचा लाभ घेणे अगदी सोपे आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना 12 कूपन दिले जाणार आहेत. या कूपनद्वारे ग्राहकांना नोव्हेंबर 2024 ते ऑक्टोबर 2025 पर्यंत दर महिन्याला प्लॅन सक्रिय करावा लागेल. यासाठी, तुम्हाला मिळालेले कुपन 30 दिवसांच्या अंतर्गत रिडीम करावे लागेल. कुपन्स तुमच्या जवळच्या रिलायन्स डिजिटल, MyJio स्टोअर, JioPoint स्टोअर, JioMart डिजिटल स्टोअरला भेट देऊन रिडीम करता येईल. प्लॅन खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :