टेलिकॉम कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्सने आपल्या CDMA ग्राहकांना रिलायन्स जिओ नेटवर्कचा वापर करुन 4G सेवा देणे सुरु केले आहे. त्याचबरोबर आपल्याला रिलायन्सच्या काही निवडक भागात केवळ ९३ रुपयात 10GB डाटा मिळणार आहे. RCom ने टेलिकॉम डिपार्टमेंटला उद्देशून म्हटले आहे की, ते रिलायन्स जिओ इन्फोकॉम 4G नेटवर्कचा वापर करुन आपल्या CDMA ग्राहकांना पुढील आठवड्यापासून 4G सेवा उपलब्ध करेल.
जवळपास ८ मिलियन ग्राहकांमध्ये जवळपास ९० टक्के लोक ह्या सेवेचा लाभ घेऊ शकतील. RComm ९३ रुपयात जवळपास 10GB डाटा देत आहे. ही सेवा सध्या मिळत असलेल्या इतर नेटवर्क सेवांपेक्षा खूपच स्वस्त असल्याचे बोलले जातय. त्याचबरोबर इतर सर्कल्समध्ये ९३ रुपये आणि ९७ रुपयात 10GB डाटा मिळत आहे. हे रेट कंपनीच्या वेबसाइटवर लिस्ट केले गेले आहे.
हेदेखील वाचा – काय मिळतय विराट फॅनबॉक्सच्या आत? पाहा आमच्या नजरेतून….
RComm ने आपली ही सेवा १२ विभागात म्हणजेच मुंबई, दिल्ली, कोलकता, गुजरात, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, UP सह ओडिसा, मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये ही सेवा सुरु केली आहे. आणि लवकरच हा आपल्या इतर 6 सर्कल्समध्येही ही सेवा सुरु करेल. तमिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि राजस्थानसह इतर दोन विभागांचाही समावेश आहे.
हेेदेखील वाचा – २९ जूनला होणार लेनोवो वाइब K5 स्मार्टफोनचा दुसरा फ्लॅशसेल
हेेदेखील वाचा – स्कलकँडी ग्राइंड वायरलेस ब्लूटुथ हेडफोन लाँच, किंमत ६,४९९ रुपये