पॉकेट फ्रेंडली Broadband प्लॅन्स: 500 रुपयांपेक्षा कमीमध्ये मिळेल 3500GB डेटा आणि मोफत कॉल
500 रुपयांपेक्षा कमी किमतीत येणारे ब्रॉडबँड प्लॅन्स
टॉप टेलिकॉम कंपन्यांच्या एंट्री लेव्हल ब्रॉडबँड प्लॅन्सची यादी बघा
AIRTEL प्लॅनमध्ये OTT बेनिफिट्स उपलब्ध
जर तुम्ही घरून काम करत असाल आणि परवडणाऱ्या किमतीत चांगले इंटरनेट कनेक्शन शोधत असाल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला देशातील टॉप फायबर इंटरनेट सेवा देणार्या सर्व टेलिकॉम कंपन्यांच्या एंट्री-लेव्हल ब्रॉडबँड प्लॅनबद्दल सांगणार आहोत. Jio, Airtel, Vodafone Idea आणि BSNL सर्व 500 रुपयांच्या खाली एंट्री-लेव्हल ब्रॉडबँड प्लॅन ऑफर करतात.
हे सुद्धा वाचा : अक्षय कुमारचा 'रक्षा बंधन' चित्रपट 'या' OTT प्लॅटफॉर्मवर येणार, 11 ऑगस्टला होणार रिलीज
AIRTEL एंट्री-लेव्हल ब्रॉडबँड प्लॅन्स
भारती AIRTEL चा एंट्री-लेव्हल ब्रॉडबँड प्लॅनची किंमत 499 रुपये प्रति महिना आहे. या प्लॅनसह, वापरकर्त्यांना 3.3TB मासिक डेटा आणि 40 Mbps स्पीड मिळेल. वापरकर्ते कंपनीकडून विनामूल्य फिक्स्ड लाइन व्हॉइस कॉलिंग कनेक्शन मिळवू शकतात, परंतु त्यांना लँडलाइन फोनसाठी स्वतंत्रपणे पैसे द्यावे लागतील. यासोबत एअरटेल एक्सस्ट्रीम, विंक म्युझिक, Shaw academy, Voot Basic, Eros Now, हंगामा प्ले, Shemaroo M And Ultra ऍप प्रवेश विनामूल्य उपलब्ध आहे.
BSNL एंट्री-लेव्हल ब्रॉडबँड प्लॅन
BSNL 329 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन ऑफर करते, ज्यामध्ये वापरकर्त्यांना 1000GB डेटा पर्यंत 20 Mbps स्पीड मिळतो. 1000GB डेटा वापरल्यानंतर स्पीड 2 Mbps पर्यंत घसरतो. या प्लॅनमध्ये फ्री फिक्स्ड लाइन व्हॉईस कॉलिंग कनेक्शन देखील समाविष्ट आहे.
JIO एंट्री-लेव्हल ब्रॉडबँड प्लॅन
रिलायन्स JIO त्याच्या ब्रँड JioFiber द्वारे फिक्स्ड-ब्रॉडबँड सेवा प्रदान करते. कंपनी आपला एंट्री-लेव्हल ब्रॉडबँड प्लॅन 399 रुपयांमध्ये ऑफर करते. हा प्लॅन 3.3TB मासिक डेटासह 30 Mbps स्पीड ऑफर करतो. JioFiber च्या या ब्रॉडबँड प्लॅनसह, वापरकर्त्याला अमर्यादित कॉलिंग सुविधा मिळते. या प्लॅनमध्ये Jio ऍप्सचा मोफत ऍक्सेस उपलब्ध आहे.
VI एंट्री-लेव्हल ब्रॉडबँड प्लॅन
Vodafone Idea U Broadband द्वारे फायबर ब्रॉडबँड सेवा पुरवते. ही एक कंपनी आहे जी देशातील निवडक शहरांमध्ये आपली सेवा प्रदान करते. अहमदाबादमध्ये कंपनीने ऑफर केलेल्या एंट्री-लेव्हल प्लॅनची किंमत प्रति महिना 400 रुपये आहे आणि 40 Mbps स्पीडसह 3.5TB डेटा प्रति महिना देते.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile