कमी किमतीत जास्तीत जास्त लाभ देणारे प्लॅन्स वापरकर्त्यांना आवडतात. म्हणूनच, टेलिकॉम कंपन्या युजर्सना अनेक उत्तम आणि परवडणारे प्लॅन ऑफर करत आहेत. येथे आम्ही तुम्हाला रिलायन्स Jio, व्होडाफोन-आयडिया Vi, Airtel आणि BSNL च्या 500 रुपयांच्या प्लॅनबद्दल सांगत आहोत. या प्लॅनमध्ये कंपन्या रोज 4 GB पर्यंत डेटा आणि फ्री कॉलिंग सारखे फायदे देत आहेत.
हे सुद्धा वाचा : 108MP कॅमेरा असलेल्या 5G फोनवर तब्बल 22,500 रुपयांची सूट, केवळ 17 मिनिटांत फूल चार्ज
हा प्लान 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये कंपनी इंटरनेट वापरासाठी दररोज 4 GB डेटा देत आहे. दररोज 100 मोफत SMS ऑफर करणाऱ्या या प्लॅनमध्ये तुम्हाला देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंग देखील मिळेल. त्याबरोबरच, यामध्ये Binge All Night, Weekend Data Rollover आणि Data Delight यांचा समावेश आहे. प्लॅनच्या सदस्यांना कंपनीकडून Vi movies आणि tv ऍपची मोफत सदस्यता देखील मिळेल.
Jio चा हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये कंपनी दररोज 3 GB डेटा देत आहे. प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 मोफत SMS पाठवण्याची सुविधाही मिळेल. कंपनी या प्लॅनमध्ये देशभरातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगची सुविधाही देत आहे. तसेच, या प्लॅनमध्ये Jio TV आणि Jio Cinema सारख्या Jio ऍप्सच्या मोफत सबस्क्रिप्शनसह येतो.
या प्लॅनमध्ये, कंपनी दररोज 100 मोफत SMS सह अमर्यादित कॉलिंग ऑफर करत आहे. प्लॅनमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी तुम्हाला दररोज 2.5 GB डेटा मिळेल. 28 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 3 महिने Disney + Hotstar सबस्क्रिप्शन मोफत मिळेल.
BSNL चा हा प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये तुम्हाला अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 मोफत SMS मिळतील. प्लॅनमध्ये कंपनी इंटरनेट वापरण्यासाठी अमर्यादित डेटाही देत आहे.