जर आम्ही तुम्हाला सांगितले की, 19 रुपयांमध्ये तुम्हाला 90 दिवसांच्या वैधतेचा प्लॅन मिळेल, तर तुम्हाला ते अशक्य वाटेल. पण, सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड BSNL फक्त रु. 19 मध्ये 90 दिवसांच्या वैधतेसह प्रीपेड प्लॅन देत आहे. इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये यूजर्सना 50MB डेटा देखील दिला जातो. इथे आम्ही BSNL च्या या प्लॅनची तुलना त्याच बजेटमध्ये बाजारात असलेल्या इतर कंपन्यांच्या प्लॅनशी करणार आहोत.
हे सुद्धा वाचा : WhatsApp वर स्टेटस टाकणे होईल अधिक मजेशीर, 'हे' फीचर्स तुम्हाला माहित आहेत का ?
हा प्लॅन एकूण 50MB डेटासह येतो. वैधता पाहता या प्रीपेड प्लॅनमध्ये 90 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. हा प्लॅन एक्स्टेंशन पॅक आहे.
या प्रीपेड प्लॅनमध्ये एकूण 1GB डेटा दिला जातो. वैधतेबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये 1 दिवसाची वैधता उपलब्ध आहे.
हा प्रीपेड प्लॅन एकूण 1GB डेटा ऑफर करतो. या प्लॅनमध्ये 24 तासांची वैधता प्रदान करण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये चित्रपट आणि टीव्ही शोचा लाभ घेता येईल.
या प्रीपेड प्लॅनमध्ये एकूण 2GB डेटा दिला जातो. वैधतेबद्दल बोलायचे तर, या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. मात्र , हा प्लॅन फक्त JioPhone वापरकर्त्यांसाठी मर्यादित आहे. हाय स्पीड डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64 Kbps पर्यंत कमी होतो.