Reliance Jio ची 5G सेवा Jio AirFiber म्हणून देशभरात प्रसिद्ध आहे. ही सेवा देशातील सुमारे 6,956 गावे आणि शहरांमध्ये उपलब्ध आहे, असे कंपनीने सांगितले आहे. म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यात ही सेवा पोहोचायला अजून वेळ असला तरी ही सेवा देशाच्या मोठ्या भागात वापरली जाऊ शकते. मात्र, भविष्यात ही सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात लवकरच उपलब्ध होणार आहे. Jio AirFiber बद्दल एक विशेष माहिती पुढे आली आहे. बघुयात सविस्तर-
Also Read: Important! घरबसल्या ऑनलाईन Aadhaar कार्ड मोफत अपडेट करण्याची पुन्हा संधी, सरकारने केली मुदतवाढ
तुमच्या माहितीसाठी, रिलायन्स Jio च्या 5G सेवेसह सुमारे 120 डिव्हाइस कनेक्ट केले जाऊ शकतात. म्हणजेच Jio AirFiber किंवा या सेवेसह 120 डिव्हाइसेसवर इंटरनेटचा वापर केला जाऊ शकतो. म्हणजेच Jio AirFiber सोबत पुरवल्या जाणाऱ्या Wi-Fi मध्ये 120 उपकरणांना इंटरनेट पुरवण्याची क्षमता आहे.
लक्षात घ्या की, Jio AirFiber सुमारे 120 उपकरणांना कनेक्ट करता येणार आहे. यामध्ये मोबाईल फोन आणि इतर उपकरणांचा समावेश आहे. जर TelecomTalk च्या रिपोर्टवर नजर टाकली तर, या रिपोर्टनुसार, या उपकरणांवर इंटरनेट स्पीड किती असेल याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. याशिवाय 120 डिव्हाईस जोडण्यासाठी किती स्पीड लागेल याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
Jio कडून असे सांगण्यात आले आहे की, इंटरनेट स्पीडचे वितरण Wi-Fi शी कनेक्ट केलेल्या उपकरणांवर आधारित असणार आहे. तुम्ही Jio कडून 1Gbps पर्यंतच्या स्पीडसह प्लॅन्स खरेदी करू शकता. या हाय-स्पीड प्लॅनमध्ये OTT बेनिफिट्स देखील समाविष्ट आहेत.
लक्षात घ्या की, अनेक उपकरणे कनेक्ट करण्यासाठी तुम्ही 1Gbps प्लॅन्स किंवा 500Mbps प्लॅन्स खरेदी करू शकता. JioAirFiber प्लॅन्सबद्दल माहितीसाठी तुम्ही MyJio ॲप किंवा Jio.com ला भेट द्या.
या श्रेणीतील तीन प्लॅन्स 599 रुपये, 899 रुपये आणि 1199 रुपये प्रति महिना किमतीत येतात. सर्व AirFiber प्लॅन्स 100Mbps पर्यंत इंटरनेट स्पीड प्रदान करतात. हे प्लॅन्स स्ट्रीमिंग, गेमिंग, ब्राउझिंग आणि कोणत्याही सामान्य वापरासाठी सर्वोत्तम आहे. या प्लॅन्ससह सदस्यांना 550 हून अधिक डिजिटल चॅनेल आणि 14 OTT ॲप्सचा ऍक्सेस देखील मिळेल. याव्यतिरिक्त, 1199 रुपयांचा टॉप टियर प्लॅन Netflix, Amazon Prime Video आणि JioCinema Premium च्या मोफत सब्स्क्रिप्शनसह येतो.
रिलायन्स Jio देशातील जवळपास सर्व वापरकर्त्यांना 5G प्रदान करण्याच्या ध्येयावर काम करत आहे. अशा परिस्थितीत, JioAirFiber सेवेचा सातत्याने विस्तार केला जात आहे. याचा पुरावा म्हणजे लाँच झाल्यानंतर ही सेवा आता हजारो शहरे आणि गावांमध्ये उपलब्ध आहे.