Vodafone Idea युजर्ससाठी खुशखबर: आता नंबर पोर्ट करण्यासाठी अतिरिक्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत

Vodafone Idea युजर्ससाठी खुशखबर: आता नंबर पोर्ट करण्यासाठी अतिरिक्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत
HIGHLIGHTS

VI वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी

नंबर पोर्ट करण्यासाठी आता जास्त पैसे खर्च होणार नाहीत

SMS बेनिफिट असणाऱ्या प्लॅनसह नंबर पोर्ट करण्यासाठी मॅसेज पाठवण्यास परवानगी

Vodafone Idea (Vi) वापरकर्त्यांसाठी ही एक चांगली बातमी आहे. जर तुम्ही Vodafone ग्राहक असाल, तर तुम्ही आता SMS बेनिफिट प्लॅनसह नंबर पोर्ट करण्यासाठी मॅसेज पाठवू शकता. Vi ग्राहकांना प्रत्येक प्रीपेड प्लॅनसह 1900 वर पोर्ट आउट SMS पाठविण्याची परवानगी देत ​​आहे. आत्तापर्यंत, जे युजर्स अतिशय वाजवी दरात उपलब्ध असलेले बेस लेव्हल प्रीपेड प्लॅन वापरत होते, ते पोर्ट आउट SMS पाठवू शकत नव्हते. कारण कंपनी त्यांना या प्लॅन्ससह हे SMS लाभ देत नव्हती.

हे सुद्धा वाचा : Vivo च्या 50MP कॅमेरा असलेल्या बजेट फोनची पहिली विक्री आज, फक्त 416 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी 

हे लक्षात घेऊन, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने ऑपरेटरना ग्राहकांना SMS फायद्यांसह प्लॅन्स नसतानाही पोर्टेड SMS पाठविण्याची परवानगी देण्यास सांगितले. यामुळे ग्राहकांचे हक्क जपले जातील. ट्रायचा आदेश खूप आधीच आला असताना, VI ने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जरा वेळ घेतला. भारती AIRTEL चे ग्राहक हे करू शकतील की नाही हे सध्या सांगता येत नाही. मात्र, आता फक्त Vi ने नो  SMS प्लॅनसोबतही पोर्ट आउट SMS पाठवण्याची सुविधा लागू केली आहे.

Vi च्या या प्लॅनमध्ये SMS फायदे उपलब्ध नाहीत 

Vodafone Idea चे प्लॅन ज्यामध्ये SMS सुविधा उपलब्ध नव्हती, ते 99 रुपये, 107 रुपये आणि 111 रुपये आहेत. पण आता या प्लॅन्समध्ये पोर्ट आऊट SMS पाठवण्याचा फायदा मिळणार आहे. म्हणजेच, तुम्हाला SMS पाठवण्यासाठी कोणत्याही महागड्या प्लॅनने रिचार्ज करण्याची गरज नाही. Vodafone Idea ने सांगितले की,  पोर्ट-आउटशी लिंक केलेल्या प्रत्येक SMS साठी मानक शुल्क आकारले जाईल. हे ग्राहक आणि कंपनी दोघांसाठी बरे होईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo