आता बीएसएनएल देणार आउटगोईंग कॉल्स मोफत

आता बीएसएनएल देणार आउटगोईंग कॉल्स मोफत
HIGHLIGHTS

बीएसएनएलने नेक्स्ट जनरेशन नेटवर्क स्विच असणारे एक्सचेंजमध्ये फिक्स्ड कन्वजेंस पद्धतीने लँडलाइन कॉलिंग सेवा मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. ह्याने सामान्य ग्राहक रात्री नऊ ते सकाळी ७ वाजेपर्यंत मोबाईलवर निर्धास्त बोलू शकता.

बीएसएनएल दिवाळीत देशातील काही शहरात एक सेवा सुरु करणार आहे, ज्याच्या अंतर्गत बीएसएनएल ग्राहक पैसे न देता मोबाईलने मोफत कॉल करु शकतो. खरे पाहता, बीएसएनएलने एक नवीन ऑफर सुरु केली आहे, ज्या अंतर्गत मोबाईल फोन कॉलला पैसे लागणार नाही.

 

बीएसएनएल हेडक्वार्टरने ह्याची ट्रायलसुद्धा घेतली आहे. आता १४० लाख टेलिफोन लाईन्सला एनजीएनने मॅप केले जाईल. बीएसएनएलने नेक्स्ट जनरेशन नेटवर्क स्विच असणारे एक्सचेंजमध्ये फिक्स्ड कन्वजेंस पद्धतीने लँडलाइन कॉलिंग सेवा मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. ह्याने सामान्य ग्राहक रात्री नऊ ते सकाळी ७ वाजेपर्यंत मोबाईल निर्धास्त बोलू शकता.

बीएसएनएल ही योजना ह्या दिवाळीत सुरु करु शकतो. बीएसएनएलचे हे फ्री कॉलिंग प्लान अशा मोबाईलधारकांना मिळेल, जे कंपनीेचे लँडलाईन कनेक्शनसुद्धा घेतील. ह्याअंतर्गत लँडलाईनवर मिळणा-या सर्व सुविधा ह्या मोबाईलवरसुद्धा उपलब्ध होतील. म्हणजेच लँडलाईनवर मिळणारी रात्रीची मोफत कॉलिंग सुविधा आता मोबाईलवरही मिळेल. ह्या ऑफरद्वारा ग्राहक आपल्या मोबाईलवर लँडलाईन फोनसुद्धा उचलू शकेल.

बीएसएनएलने लँडलाईन सुविधेला आधुनिक बनविण्यासाठी ४०० करोडची गुंतवणूक केली आहे. बीएसएनएलकडून ग्राहकांना फ्री रोमिंग सुविधा आधीच दिलेली आहे. ह्या कंपनीच्या ग्राहकांना आता रोमिंग दरम्यान इनकमिंग कॉल्सवर कोणताही अतिरिक्त चार्ज द्यावा लागणार नाही.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo