नोकिया नेटवर्क्स नोकियाची एक सब्सिडरी कंपनी असण्यासोबत भारतात टेलिकम्युनिकेशनेस स्टँडर्ड डेव्हलपमेंट सोसायटीचा एक भाग आहे. आणि आता अशी बातमी आली आहे की, आता नोकिया देशात 5G नेटवर्कच्या ट्रायलची योजना बनवत आहे. PTI रिपोर्टनुसार, नोकिया नेटवर्क्स, अमेरिका, साउथ कोरिया आणि जपानमध्ये ह्या सेवेची ट्रायलसुद्धा सुरु केली आहे. ही ह्या देशांच्या ऑपरेटर्स मिळून केली जात आहे. तसेच लवकरच भारतामध्येही ह्याची ट्रायल सुरु होणार आहे.
असे पाहण्यात आलय की, आता लवकरच भारतात 5G ट्रायल सुरु होणार आहे. तथापि, भारतात पॅन इंडियाचा 4G नेटवर्क ह्याच्या मध्यावरच आहे. भारतीय एयरटेल आपली 4G सेवा २०१२ साली सुरु केली होती. त्यानंतर आतापर्यंत वोडाफोन आणि रिलायन्स ह्याला फॉलो करत आहे. वोडाफोन आता जेथे जेथे ही सेवा उपलब्ध आहे, तेथे तेथे सुपरनेट 4G देत आहे. त्याचबरोबर एयरटेल आणि रिलायन्ससुद्धा असेच काहीसे करत आहे. तथापि, अजूनही स्मार्टफोन्स आणि इतर डिवाइसवर 3G किंवा 2G कनेक्टिव्हिटी मिळत आहे.
नोकिया नेटवर्क्समध्ये मोबाईल ब्रॉडबँडच्या मुख्य मिलिवोज वेलाने PTI ला सांगितले आहे की, “5G चे स्वप्न भारतात आता लवकरच खरं होण्याच्या मार्गावर आहे आणि २०२० पर्यंत मुख्यधाराशी जोडले जाईल” हे सर्व एका प्रोजेक्ट अंतर्गत केले जाईल.
हेदेखील वाचा – जगातील पहिला क्लाउड स्टोरेज स्मार्टफोन अखेर लाँच, किंमत १९,९९९ रुपये
हेदेखील वाचा – फ्लिपकार्टवर मिळत आहे स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स आणि इतर गॅजेट्सवर भारी सूट