प्रत्येक मोबाईल युजरसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मोबाईलसह आता सिम कार्डही तुमच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनली आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, नवीन SIM कार्ड नियम 1 डिसेंबर 2023 पासून लागू होणार आहेत. हे नवीन नियम 1 ऑक्टोबर 2023 रोजी लागू होणार होते, जरी सरकारने ते नवीन सिम कार्ड नियम दोन महिन्यांसाठी पुढे ढकलले होते. चला तर मग जाणून घेऊयात सिमकार्डबाबतचे नियम-
जर तुम्ही नवीन सिम कार्ड खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा सिम कार्ड विक्रेता असाल तेव्हा हे नियम अधिक महत्त्वाचे होतात.
हे सुद्धा वाचा: अरे व्वा! नेहमी डिमांडमध्ये राहणाऱ्या Apple Airpods Pro वर Sale सुरु, जाणून घ्या किंमत आणि Best ऑफर्स
जर कोणत्याही व्यक्तीला सिम कार्ड विकायचे असेल किंवा सिमकार्ड डीलर असेल तर त्याला वेरिफिकेशन करणे आवश्यक आहे. सिमकार्ड विकताना त्याची नोंदणी करावी लागणार आहे. पोलिस व्हेरिफिकेशन करून घेण्याची जबाबदारी टेलिकॉम ऑपरेटरची असेल. जर तुम्ही या नियमानुसार व्यवहार केला नाही तर, 10 लाख रुपयांचा दंड भरावा लागेल.
जर कोणताही ग्राहक त्याच्या विद्यमान क्रमांकासाठी म्हणजेच ऍक्टिव्ह नंबरसाठी सिम कार्ड खरेदी करत असाल तर त्याला त्याचे आधार कार्ड आणि डेमोग्राफिक डेटा सबमिट करावा लागेल.
नव्या नियमांमुळे सिमकार्ड विक्रीवर मर्यादा येणार आहेत. जर एखादी व्यक्ती मोठ्या प्रमाणात सिम कार्ड खरेदी करत असेल तर तो फक्त व्यवसाय कनेक्शनद्वारेच जास्त प्रमाणात सिम खरेदी करू शकतो. तुमचा व्यवसाय असेल तरच तुम्ही मोठ्या प्रमाणात सिम कार्ड खरेदी करू शकता. लक्षात घ्या की, एक व्यक्ती एका ID वर 9 सिम कार्ड खरेदी करू शकतो.
जर तुम्ही सिमकार्ड बंद केला तर त्यानंतर 90 दिवसांनंतर हा क्रमांक दुसऱ्या व्यक्तीला देणार येईल, असे देखील सांगण्यात आले आहे.
सिम विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी न केल्यास त्यांना 10 लाख रुपयांचा दंड भरावा लागेल. याशिवाय, त्यांना तुरुंगवासही होण्याची शक्यता आहे.