digit zero1 awards

Jio Space Fiber: आता तुमच्या फोनवर थेट आकाशातून मिळेल सुपरफास्ट इंटरनेट, बघा Jio ची New सर्व्हिस। Tech News 

Jio Space Fiber: आता तुमच्या फोनवर थेट आकाशातून मिळेल सुपरफास्ट इंटरनेट, बघा Jio ची New सर्व्हिस। Tech News 
HIGHLIGHTS

Jio ची नवी सर्व्हिस Jio Space Fiber ही नवी सेवा कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी सादर केली आहे.

Jio Space Fiber सर्व्हिससह तुम्हाला अगदी सुपरफास्ट इंटरनेटची सुविधा मिळेल.

सर्व्हिसमध्ये वापरकर्त्यांना कॉल किंवा इंटरनेट वापरण्यासाठी मोबाईल टॉवरची देखील गरज भासणार नाही.

सध्या सगळ जग जलद गतीने चालत असल्याचे चित्र आपण रोजच बघत असतो. सुपरफास्ट इंटरनेटच्या मदतीने तुमचे जवळपास सर्व कामे अगदी लगेच होतात. मात्र, काहींना स्लो इंटरनेट स्पीडचा देखील सामना करावा लागतो. यामुळे बरीच कामे अडून देखील राहू शकतात. जर तुम्ही देखील स्लो इंटरनेटमुळे त्रासलेले असाल आणि वेगवान कनेक्शन शोधत असाल, तर तुमच्यासाठी ‘Jio Space Fiber’ हा एक चांगला पर्याय असू शकतो.

हे सुद्धा वाचा: WhatsApp चे खास फिचर! इंटरनेटशिवाय पाठवता येतील फोटो, Video आणि मोठ-मोठ्या फाइल्स। Tech News

होय, Jio Space Fiber ही नवी सेवा कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी सादर केली आहे. आम्ही तुम्हा सांगतो की, सध्याच्या टॉवर नेटवर्किंगपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यामध्ये वापरकर्त्यांना कॉल करण्यासाठी किंवा इंटरनेट वापरण्यासाठी मोबाईल टॉवरची देखील गरज भासणार नाही.

JioSpaceFiber at IMC
JioSpaceFiber

Jio Space Fiber म्हणजे काय?

Jio Space Fiber नावावरूनच समजले असेल की, ही एक उपग्रह सेवा (सॅटेलाईट सर्व्हिस) आहे, ज्यामध्ये रिसीव्हरच्या मदतीने थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट मिळेल. या टेक्नॉलॉजीचे प्रमुख फिचर म्हणजे रिसीव्हर चालत्या कार किंवा रुग्णवाहिकेवर बसवता येईल. त्यामुळे चालत्या वाहनातही विना अडथडा इंटरनेट वापरता येणार आहे. यासह, वापरकर्त्यांना कमी इंटरनेट स्पीडबद्दल काळजी करण्याची अजिबात गरज नाही कारण कंपनी त्याच्यासोबत 1GBPS चा हाय-स्पीड ऑफर करणार आहे.

स्पेस फायबर टेक्नॉलॉजीचे वैशिष्ट्य म्हणजे यात वायर्ससारख्या पातळ फायबर ऑप्टिक केबल्सचा वापर केला जातो, ज्याद्वारे डेटा प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतो. म्हणजेच या नवीन सेवेमुळे तुम्हाला खूप वेगवान इंटरनेट स्पीड मिळण्याची अपेक्षा आहे. त्याबरोबरच, फायबर ऑप्टिक केबल्सवर इलेक्ट्रिकल केबल्सप्रमाणे खराब हवामानाचा परिणाम होत नाही. हे कनेक्शन अधिक विश्वासार्ह बनवते आणि व्यत्यय येण्याची शक्यता कमी आहे.

Jio New Service
Jio New Service

लक्षात घ्या की, स्पेस फायबरच्या माध्यमातून तुम्हाला हायस्पीड मिळाल्यास, तुम्ही एकाच वेळी घरातील अनेक उपकरणे जसे की कम्प्युटर, लॅपटॉप, स्मार्टफोन, स्मार्ट TV इ. सहज चालवू शकता.

‘या’ शहरांमध्ये नवी सर्व्हिस उपलब्ध

सध्या Jio Space Fiber सर्व्हिस भारतात लाँच झाली नाही. कंपनीने काही निवडक शहरांमध्ये टेस्टिंगच्या टप्प्यात ही सर्व्हिस सुरू केली. सर्व प्रथम, ही नवीन मोबाइल सेवा गुजरातच्या गिर नॅशनल पार्क, आसामचे ओएनजीसी-जोरहट, ओरिसाचे नबरंगपूर आणि छत्तीसगडमधील कोरबा येथे सुरू करण्यात आली. नव्या सर्व्हिसच्या किमतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती पुढे आलेली नाही.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo