मथळ्यावरून तुम्हाला कळलंच असेल की, टेलिकॉम दिग्गज Reliance Jio ने दोन नवीन 'Jio-Netflix प्रीपेड प्लॅन' लाँच केले आहेत. नावाप्रमाणे नक्कीच हे प्लॅन्स Netflix सबस्क्रिप्शनसह येतात. Jio-Netflix प्रीपेड प्लॅनच्या दोन्ही प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता मिळेल. याचा अर्थ असा की, कंपनीने टेलिकॉम बेनिफिट्स सह तुमच्या मनोरंजनाची पूर्ण सोय केली आहे. बघा सविस्तर माहिती-
पहिल्या Jio-Netflix प्रीपेड प्लॅनची किमंत 1,099 रुपये आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा मिळेल. त्याबरोबरच, दुसऱ्या Jio-Netflix प्रीपेड प्लॅनची किमंत 1,499 रुपये इतकी आहे. या प्लॅनमध्ये कंपनी दररोज 3GB डेटा देत आहे. वर सांगितल्याप्रमाणे दोन्ही प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, प्रीपेड प्लॅनवर Netflix सबस्क्रिप्शन उपलब्ध होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Netflix सह, ग्राहक त्यांच्या मोबाइल डिव्हाइसवर कधीही, कुठेही हॉलीवूड ते बॉलिवूड, भारतीय प्रादेशिक चित्रपट आणि बरेच काही लोकप्रिय टीव्ही शोज पाहू शकतील. एवढेच नाही, तर जगभरातील प्रसिद्ध वेब सिरीज देखील प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. तुम्ही या प्लॅनसह अखंडितपणे स्वतःच्या आवडीचे शो बघू शकता. जिओच्या इतर प्लॅनप्रमाणेच ग्राहकांना दोन्ही प्लॅनमध्ये ऑनलाइन किंवा ऑफलाइन रिचार्जची सुविधा मिळेल.
त्याबोरबच, विशेष म्हणजे ग्राहकाची इच्छा असल्यास, नेटफ्लिक्स ऍप एकाधिक डिव्हाइसवर डाउनलोड केले जाऊ शकते. एवढेच नाही तर, प्लॅटफॉर्म समान लॉगिन क्रेडेन्शियल्ससह वापरले जाऊ शकते. मात्र, लक्षात घ्या की, ते एकावेळी एकाच उपकरणावर पाहता येईल. याव्यतिरिक्त, 1,499 रुपयांच्या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स टीव्ही किंवा लॅपटॉप सारख्या कोणत्याही मोठ्या स्क्रीनवर देखील स्ट्रीम करता येईल.