Jio ने युजर्सना दिले मोठे गिफ्ट! 3 नवे Jio 5G ट्रू Unlimited प्लॅन्स गपचूप केले लाँच, किंमतही कमी
Jio ने गपचूप तीन नवीन 'ट्रू Unlimited' अपग्रेड प्लॅन्स लाँच केले.
Jio ने नवे 51,101 आणि 151 रुपयांच्या नवे डेटा प्लॅन लाँच केले.
Jio चे नवे प्लॅन्स अमर्यादित 5G डेटासह येतात
देशातील सर्वात आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स Jio ने अलिडकेच टॅरिफ हाईक करून आपण युजर्सना मोठा धक्का दिला आहे. होय, आपल्या रिचार्ज प्लॅन्सच्या किमती वाढवल्यानंतर आणि काही प्लॅन्स बंद केल्यानंतर, Jio ने गपचूप तीन नवीन ‘ट्रू Unlimited’ अपग्रेड प्लॅन्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट केले आहेत. हे प्लॅन्स अमर्यादित 5G डेटासह येतात आणि तुमच्या विद्यमान सक्रिय प्लॅनच्या वैधतेशी जुळतात.
या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Jio च्या नव्या 51,101 आणि 151 रुपयांच्या प्लॅनबद्दल माहीत देणार आहोत. तसेच, या प्लॅन्सचा वापर कसा करता येईल, याबद्दलही आम्ही माहिती देणार आहोत. त्यामुळे संपूर्ण माहिती शेवटपर्यंत वाचा.
51 रुपयांचा Jio डेटा प्लॅन
या प्लॅनमध्ये तुम्हाला 3GB हाय-स्पीड 4G इंटरनेट मिळेल. हा डेटा संपल्यानंतर स्पीड 64Kbps (FUP लिमिट) पर्यंत कमी होईल. या प्लॅनची वैधता तुमच्या सक्रिय बेस प्लॅनसारखीच असेल. त्यामुळे तुमच्याकडे मासिक किंवा वार्षिक योजना असल्यास, मुख्य प्लॅन कालबाह्य होईपर्यंत हा प्लॅन सक्रियच राहील.
101 रुपयांचा Jio डेटा प्लॅन
या प्लॅनमध्ये तुम्हाला 6GB हाय-स्पीड 4G डेटा मिळतो, पण एकदा तुम्ही 6GB डेटा वापरला की स्पीड 64Kbps पर्यंत घसरतो. वरील प्लॅनप्रमाणे या प्लॅनची वैधता देखील तुमच्या बेस प्लॅनची मुदत संपेपर्यंत असणार आहे.
151 रुपयांचा Jio डेटा प्लॅन
या प्लॅनमध्ये तुम्हाला 9GB 4G हाय-स्पीड डेटा मिळतो. या प्लॅनची FUP मर्यादा वरील दोन्ही प्लॅनप्रमाणेच आहेत. एवढेच नाही तर, वैधता नियम देखील वरील प्लॅन्सप्रमाणेच आहेत.
Jio 5G ट्रू Unlimited प्लॅन्सचा वापर कसा कराल?
- अमर्यादित 5G 2GB दैनिक किंवा त्याहून अधिक डेटासह Jio रिचार्ज प्लॅन्सपर्यंत मर्यादित होते. मात्र, आता तुम्हाला ते या 3 नव्या डेटा प्लॅनसह मिळेल. लक्षात घ्या की, हे प्लॅन्स केवळ दैनिक डेटा मर्यादेसह येणाऱ्या प्लॅनसह कार्य करतात.
- नवे प्लॅन्स वापरण्यासाठी तुमच्याकडे 5G-सपोर्टेड डिव्हाइस असणे आणि Jio 5G नेटवर्क असलेल्या भागात राहणे आवश्यक आहे. हे 3 ‘ट्रू अनलिमिटेड अपग्रेड’ प्लॅन्स कॅटलॉगमध्ये जोडले गेले आहेत, ज्यात आधीपासून 16 ट्रू 5G अमर्यादित प्लॅन्स समाविष्ट आहेत.
- लक्षात घ्या की, Jio True Unlimited अपग्रेड प्लॅन्स फक्त Jio.com (वेबसाइट) वर उपलब्ध आहेत. ते नंतर My Jio ॲप आणि इतर थर्ड पार्टी रिचार्ज ॲप्सवर सुद्धा मिळण्याची शक्यता आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही Jio च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile