BSNL ने अलीकडेच महिन्याभराच्या वैधतेसह दोन प्लॅन लाँच केले आहेत. जे Jio पेक्षा जास्त फायदे देतात. हे BSNL रिचार्ज प्लॅन अतिशय परवडणारे आहेत आणि पॉकेट फ्रेंडली प्राईस टॅगसह येतात, ज्याची किंमत 250 रुपयांपेक्षा कमी आहे. डेटा आणि कॉलिंग फायद्यांव्यतिरिक्त, हे प्लॅन्स वेब ब्राउझरद्वारे चॅलेंज एरिना मोबाइल गेमिंग सेवेसह देखील येतात.
हे सुद्धा वाचा : अप्रतिम ऑफर ! iPhone 13 स्वस्तात खरेदी करण्याची उत्तम संधी, मिळतेय 19 हजार रुपयांची सूट
चला तर मग BSNL आणि Jio च्या एका महिन्याच्या प्लॅनमध्ये कोणते फायदे उपलब्ध आहेत, ते जाणून घेऊयात…
BSNL च्या 228 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल आणि 2 GB डेटा प्रतिदिन मिळतो. डेटा संपल्यानंतरही, वापरकर्त्यांना 80 kbps स्पीडने इंटरनेट मिळतो. याशिवाय, पॅकेजमध्ये दररोज 100 SMS चा लाभ समाविष्ट आहे. हा प्लॅन महिना-दर-दिवसाच्या आधारावर उपलब्ध आहे. म्हणजेच, जर 30 दिवसांचा महिना असेल तर 30 दिवसांची वैधता मिळेल. 31 दिवसांचा महिना असेल तर 31 दिवसांची वैधता मिळेल.
BSNL च्या 239 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे. याशिवाय ग्राहकांना 100 SMS आणि 2GB डेटा दररोज दिला जातो. वापरकर्ते BSNL च्या या 239 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनवर वेब ब्राउझरद्वारे चॅलेंज एरिनाची मोबाइल गेमिंग सेवा देखील ऍक्सेस करू शकतात.
Jio चा 181 रुपयांचा प्लॅन असून त्याची वैधता 30 दिवस आहे. तुम्हाला ही योजना वर्क फ्रॉम होम कॅटेगरीमध्ये मिळेल. हा प्लॅन खास अशा लोकांसाठी तयार करण्यात आला आहे, ज्यांना अधिक डेटाची गरज आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 30 GB डेटा मिळेल आणि दैनंदिन डेटा वापरावर कोणतीही मर्यादा नाही. म्हणजेच तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही एका दिवसात 30 GB डेटा संपवू शकता किंवा तुम्हाला दररोज 1 GB डेटा वापरता येईल. या प्लॅनमध्ये कॉलिंग किंवा मेसेजिंग सुविधा मिळणार नाही.
हा प्लॅन सुद्धा वर्क फ्रॉम होम कॅटेगरी प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये 30 दिवसांची वैधता देखील उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये एकूण 40 GB डेटा उपलब्ध आहे. हा वर्क फ्रॉम होम डेटा प्लॅन असल्याने यामध्ये कॉलिंग किंवा मेसेजिंगची सुविधाही असणार नाही.