Airtel Festive Offer: या ‘3’ प्लॅन्समध्ये भरपूर डेटासह मिळतील तब्बल 20 पेक्षा जास्त OTT सबस्क्रिप्शन्स, ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध  

Airtel Festive Offer: या ‘3’ प्लॅन्समध्ये भरपूर डेटासह मिळतील तब्बल 20 पेक्षा जास्त OTT सबस्क्रिप्शन्स, ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध  
HIGHLIGHTS

भारती Airtel ने आपल्या यूजर्ससाठी आकर्षक फेस्टिव्ह ऑफर आणली आहे.

Airtel Festive Offer फक्त 6 ते 11 सप्टेंबर 2024 पर्यंत वैध असणार आहे.

ऑफर अंतर्गत Airtel च्या तीन प्लॅनमध्ये मिळतील OTT आणि डेटा बेनिफिट्स

लोकप्रिय टेलिकॉम कंपनी भारती Airtel ने आपल्या यूजर्ससाठी फेस्टिव्ह ऑफर आणली आहे. या आकर्षक ऑफर अंतर्गत यूजर्सना फ्री डेटा तसेच OTT चे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळत आहे. Airtel ने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी ही ऑफर सादर केली आहे. एकूण तीन प्लॅन्ससह अनेक फायदे मोफत उपलब्ध आहेत. मात्र, लक्षात घ्या की, ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. एवढेच नाही तर, हे सर्व प्लॅन अमर्यादित 5G डेटासह येतात. पहा नव्या ऑफरचे सर्व तपशील-

Airtel Festive Offer

लक्षात घ्या की, Airtel Festive Offer फक्त 6 ते 11 सप्टेंबर 2024 पर्यंत वैध असणार आहे. 11 सप्टेंबरपर्यंत रिचार्ज करून वापरकर्ते हे फायदे घेण्यास सक्षम असतील.

979 रुपयांचा प्लॅन

Airtel च्या 979 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये विशेष फायदे देत आहे. या प्लॅनची ​​वैधता 84 दिवसांची आहे. या प्लॅनमधील बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, 2GB दैनिक डेटासह अमर्यादित कॉलिंग आणि 100 मोफत SMS उपलब्ध आहेत. फेस्टिव्ह ऑफर अंतर्गत, या प्लॅनमध्ये Sony LIV, Lionsgate Play, Aha, Chaupal, Hoichoi, SunNxt सारख्या 22 पेक्षा जास्त OTT चे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. तसेच, अतिरिक्त 10GB डेटा 28 दिवसांसाठी उपलब्ध आहे. मोफत हॅलो ट्यून देखील उपलब्ध आहेत.

Airtel festive offer

1029 रुपयांचा प्लॅन

1029 रुपयांच्या प्लॅनची वैधता एकूण 84 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि मोफत SMS उपलब्ध आहेत. हा प्लॅन 3 महिन्यांसाठी Disney+ Hotstar चे सबस्क्रिप्शन देखील देते. विशेष ऑफर अंतर्गत, Xstream प्रीमियम 28 दिवसांसाठी उपलब्ध आहे, ज्यामध्ये अनेक ॲप्सचे विनामूल्य ऍक्सेस मिळेल. तसेच, 28 दिवसांसाठी 10GB डेटा देखील उपलब्ध आहे.

3599 रुपयांचा प्लॅन

Airtel च्या या प्लॅनमध्ये देखील अनेक महत्त्वाचे बेनिफिट्स उपलब्ध आहेत. यात 2GB दैनिक डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि मोफत SMS वर्षभर उपलब्ध आहेत. विशेष ऑफर अंतर्गत, वरील प्लॅन्समध्ये मिळणारे OTT लाभ आणि भरपूर डेटा असे फायदे देखील मिळणार आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo