Netplus ब्रॉडबँड ने सादर केला नवीन प्लान, 1099 रुपयांमध्ये मिळत आहे 500GB डेटा

Updated on 25-Apr-2018
HIGHLIGHTS

Rs 699 प्लान मध्ये FUP स्पीड नंतर 10 MBPS स्पीड मिळतो तर Rs 1099 च्या प्लान मध्ये FUP स्पीड नंतर 20 MBPS स्पीड मिळतो. हे प्लान्स पंजाब आणि हरियाणा मध्ये उपलब्ध आहेत.

Netplus ब्रॉडबँड पंजाब आणि हरियाणा मध्ये लीडिंग इंटरनेट सर्विस प्रोवाइडर आहे, ज्यांनी आपला नवीन Net+ स्पीड प्लान जारी केला आहे आणि या प्लान चा स्पीड 100 MBPS आहे. Netplus अनेक ब्रॉडबँड प्लान्स आणि FTTH  प्लान्स ऑफर करतो. 
Netplus Rs 699 मध्ये प्रतिमाह 100 MBPS च्या स्पीड ने डाटा मिळत आहे पण याच्या जवळपास सर्वच प्लान्स मध्ये FUP लिमिट आहे. कंपनी अनेक डेडिकेटेड अनलिमिटेड डाटा प्लान्स ऑफर करते पण या प्लान्स ची अधिकतम लिमिट 50 MBPS आहे. Netplus ने दोन नवीन प्लान्स सादर केले आहेत ज्यांचा स्पीड 100 MBPS आहे. 
Netplus च्या Rs 699 च्या 100 MBPS FTTH प्लान मध्ये 100GB प्रतिमाह डाटा मिळत आहे तर Rs 1099 च्या प्लान मध्ये 100 MBPS च्या स्पीड ने 500GB FUP मिळत आहे. Rs 699 प्लान मध्ये FUP स्पीड नंतर 10 MBPS स्पीड मिळतो तर Rs 1099 च्या प्लान मध्ये FUP स्पीड नंतर 20 MBPS स्पीड मिळतो. हे प्लान्स पंजाब आणि हरियाणा मध्ये उपलब्ध आहेत. 
Netplus दावा करत आहे की हे प्लान पंजाब आणि हरियाणा मध्ये असलेल्या इतर ब्रॉडबँड ऑफर्स च्या तुलनेत 20 पट हाई स्पीड आणि चार पट डाटा ऑफर करताता आणि हे प्लान्स अन्य प्रतिस्पर्धींच्या तुलनेत एवढा डाटा अर्ध्या किंमतीत ऑफर करत आहे. 
या प्लान्स व्यतिरिक्त, Netplus त्या यूजर्सना दोन महिन्याचे फ्री कनेक्शन देत आहे जे 12 महिन्यांचा प्लान घेतील. Netplus च्या Rs 1599 च्या प्लान मध्ये प्रतिमाह 500GB डाटा मिळतो ज्याचा स्पीड 200 MBPS आहे, या प्लान मध्ये पण FUP लिमिट देण्यात आली आहे आणि हा FUP स्पीड संपताच यूजर्स 50 Mbps च्या स्पीड वर डाटा वापरू शकतील. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :