Jio चा 1 प्लॅन 4 जणांना वापरता येईल, दरमहा 200GB डेटा, Netflix-Prime देखील मोफत

Jio चा 1 प्लॅन 4 जणांना वापरता येईल, दरमहा 200GB डेटा, Netflix-Prime देखील मोफत
HIGHLIGHTS

JIO चा 999 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

कंपनीचा एक प्लॅन एकाच वेळी 4 लोक वापरू शकतात.

Amazon Prime, Netflix, Disney + Hotstar, JioTV, JioSecurity आणि JioCloud सारख्या ऍप्सचे सबस्क्रिप्शन उपलब्ध

रिलायन्स जिओ आपल्या प्रीपेड तसेच पोस्टपेड वापरकर्त्यांना उत्तम प्लॅन्स ऑफर करत आहे. कंपनी JioPostPaid Plus अंतर्गत एकूण 5 पोस्टपेड प्लॅन ऑफर करते. विशेष बाब म्हणजे कंपनीचा एक प्लॅन एकाच वेळी 4 लोक वापरू शकतात. तुमच्याही कुटुंबात चार सदस्य असतील तर तुमची सर्व कामे एकाच प्लॅनमध्ये होतील. प्लॅनची ​​किंमत 999 रुपये आहे. जाणून घेऊया संपूर्ण तपशील…

हे सुद्धा वाचा : लॉन्चपूर्वी मोठा खुलासा! 'ही' असेल Redmi K50i ची किंमत, मिळतील जबरदस्त फीचर्स

JIO चा 999 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

Jio चा हा पोस्टपेड प्लॅन 999 रुपये प्रति महिना आहे. प्लॅनमध्ये तुम्हाला 200 GB डेटा दिला जातो. मर्यादा संपल्यानंतर, 10 रुपये प्रति GB शुल्क आकारले जाते. प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS देखील दिले जातात.

यामध्ये एका प्रायमरी सिमसोबत 3 अतिरिक्त सिम देखील दिले आहेत. म्हणजेच एकाच वेळी 4 जणांना एकच प्लॅन वापरता येणार आहे. एकूण 200 GB डेटा मिळण्याचा अर्थ असा आहे की, जर सर्व वापरकर्ते समान रीतीने वापरत असतील, तर एका वापरकर्त्याला एका महिन्यात 50 GB डेटा मिळेल.

इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, प्लॅनमध्ये 500 GB पर्यंत डेटा रोलओव्हर सुविधा देखील देण्यात आली आहे. यासोबत Amazon Prime, Netflix, Disney + Hotstar, JioTV, JioSecurity आणि JioCloud सारख्या ऍप्सचे सबस्क्रिप्शन देखील दिले आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo