एक लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म म्हणून Netflix ची जगभरात ओळख आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी यावर टीव्ही शोज, चित्रपट, वेब सिरीज आणि ओरिजनल्स इ. बराच कंटेंट आहे. यावर तुम्हाला फॉरेन सामग्रीचा देखील लाभ घेता येणार आहे. पण, हा कंटेंट पाहण्यासाठी तुम्हाला सब्सक्रिप्शन प्लॅनची आवश्यकता आहे. Netflix चे सब्स्क्रिप्शन प्लॅन 149 रुपयांपासून सुरु होते. पण तुम्ही सबस्क्रिप्शन मोफतमध्ये देखील मिळवू शकता. होय, JIO च्या काही रिचार्ज प्लॅन्समध्ये नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन प्लॅन उपलब्ध आहे.
यामध्ये एकूण 150GB GB डेटा ऑफर केला जातो. तर डेटा संपल्यानंतर 10 रुपये प्रति GB डेटा शुल्क लागेल. तसेच, यात अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100SMS सुविधा देखील उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये दोन सिम जोडले जाऊ शकतात. या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स, Amazon प्राइम व्हिडिओ सबस्क्रिप्शन मोफत देण्यात आले आहे.
Jio च्या या प्लॅनमध्ये 200 GB डेटा दिला जात आहे. तसेच, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100SMS सुविधाही दिली जात आहे. या प्लॅनमध्ये तीन सिम कनेक्शन जोडता येतील. यामध्ये फ्री नेटफ्लिक्स आणि Amazon प्राइम सब्सक्रिप्शन देखील दिले जात आहे.
या प्लॅनमध्ये सुद्धा अनलिमिटेड कॉलिंगसोबतच इंटरनॅशनल रोमिंगची सुविधा मिळेल. यात एकूण 300GB डेटा आणि 100 SMS ची सुविधा दिली जात आहे. हा एक पोस्टपेड पण आहे. विशेषतः यात तुम्हाला फ्री नेटफ्लिक्स आणि Amazon प्राइम सब्सक्रिप्शन दिले जात आहे.