अरे वा ! वेगळे रिचार्ज करण्याचे टेन्शन नाही, Netflix आणि Prime Video बघा अगदी मोफत

Updated on 13-Jun-2023
HIGHLIGHTS

Netflix आणि Amazon Prime Video भारतीय सिनेरसिकांमध्ये लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म्स

Netflix मोबाईल प्लॅन्सची सुरुवातीची किंमत 149 रुपये प्रति महिना

आता या ऍप्सचे वेगळे सब्स्क्रिप्शन घेण्याची गरज नाही.

Netflix आणि Amazon Prime Video भारतीय सिनेरसिकांमध्ये/प्रेक्षकांमध्ये आवडते आणि प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म्सपैकी एक आहेत. व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर तुम्हाला आवडीचा कंटेंट कुठेही आणि अगदी कधीही बघता येतो. मात्र, यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या दोन्ही OTT ऍप्सचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. पण आता या ऍप्सचे वेगळे सब्स्क्रिप्शन घेण्याची गरज नाही. का? पुढे वाचा –

तुम्ही Netflix आणि Amazon Prime Video वरील कंटेंट पाहण्यासाठी Jio आणि Airtelचे पोस्टपेड प्लॅन्स घेऊ शकता. या प्लॅनमध्ये तुम्हाला Netflix आणि Amazon Prime Video चे सबस्क्रिप्शन मोफत मिळेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, Amazon Prime Video ग्राहकांना आधीच 1 महिन्याची फ्री ट्रायल ऑफर करत आहे. भारतात Netflix मोबाईल प्लॅन्सची सुरुवातीची किंमत 149 रुपये प्रति महिना आहे. तर, प्राईम व्हीडिओ मंथली प्लॅनची किमंत 299 रुपये आहे. 

Jio चा 699 रुपयांचा प्लॅन

जिओच्या 699  रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये Netflix आणि Amazon Prime Video, JioCinema आणि Jio टीव्हीचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते. या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, 100GB डेटा आणि 100 SMS प्रतिदिन लाभ मंथली बेसिसवर मिळतो. याबाबत अधिक माहितीसाठी Jio च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. 

Airtel चा 1,199 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमधील OTT फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, हा प्लॅन Netflix बेसिक मंथली सब्स्क्रिप्शन मोफत ऑफर करतो. त्याबरोबरच, Amazon प्राइम मेंबरशिप 6 महिन्यांसाठी, Disney + Hotstar Mobile आणि Wynk Premium 1 वर्षासाठी उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :