MTNL मोबाईल यूजरसाठी १ जानेवारीपासून सुरु होणार मोफत रोमिंग सुविधा
मुंबई आणि दिल्लीमध्ये सेवा देणारी MTNL टेलिकॉम कंपनीच्या आता आपल्या ग्राहकांना मोफत रोमिंग सेवा उपलब्ध करुन देणार आहे.
दूरसंचार कंपनी MTNL नववर्षाच्या निमित्ताने ग्राहकांना एक खूशखबर घेऊन आली आहे. खरे पाहता MTNL 1 जानेवारीपासून मोबाईल यूजरला मोफत रोमिंग सेवा देईल. मुंबई आणि दिल्लीमध्ये सेवा देणा-या MTNL टेलिकॉम कंपनीच्या ग्राहकांना आता देशात कुठेही फोनवर बोलताना अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
MTNL ची मोफत रोमिंग सुविधेविषयी दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसादने ही माहिती दिली आहे. त्यांनी ह्या संबंधी सोमवारी घोषणा केली. सध्यातरी एमटीएनएल ग्राहकांना दिल्ली आणि मुंबई बाहेर इनकमिंग कॉलसाठी रोमिंग शुल्क द्यावे लागत आहे.
त्याचबरोबर ह्या विषयी MTNL चे चेअरमन आणि प्रबंध निर्देशक.एन.के.यादव यांनी अशी माहिती दिली की, कंपनी १ जानेवारीच्या आधीपासून ही सेवा लागू करण्याच्या प्रयत्नात आहे. आणि सरकार राष्ट्रीय दूरसंचार नीति 2012 च्या अंतर्गत देशात हळूहळू मोफत रोमिंग सुविधा लागू करण्याचे आमचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
BSNL आधीपासूनच मोफत रोमिंग सेवा देत आहे. BSNL ने आपल्या मोफत रोमिंगची सुरुवात जून महिन्यापासून केली होती.
Digit NewsDesk
Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile