MTNL ने फक्त Rs 421 मध्ये सादर केला नवीन प्रीपेड प्लान 83 दिवसांसाठी मिळेल 3GB डाटा प्रतिदिन
MTNL ने जियो ला टक्कर देत 3GB डाटा प्रतिदिन च्या लिमिट सह आपले दोन नवीन STV प्लान आणले आहेत, जे कमी किंमतीत जास्त फायदे देत आहेत, चला जाणून घेऊया यांच्याबद्दल.
मुंबई आणि दिल्ली सर्कल मध्ये प्रभावी पणे चालणारी सरकारी टेलीकॉम कंपनी MTNL ने एक नवीन STV प्लान सादर केला आहे. कंपनी ने हा प्लान आपल्या प्रीपेड यूजर्स साठी सादर केला आहे. आपण या प्लान ची तुलना जियो आणि एयरटेल च्या कोणत्याही प्लान सोबत केली तर या प्लान मध्ये तुम्हाला कमी किंमतीत जास्त डेली डाटा मिळत आहे. हा प्लान कंपनी ने नवीन STV च्या रुपात फक्त Rs 421 च्या किंमतीत लॉन्च केला आहे, या प्लान मध्ये तुम्हाला 84 दिवसांसाठी 3GB डाटा प्रतिदिन मिळत आहे.
तसेच अजुन एक प्लान पण कंपनी कडून समोर आला आहे, जो फक्त Rs 365 च्या किंमतीत येतो, यात पण तुम्हाला एवढाच डाटा मिळत आहे, पण या प्लान ची वैधता पण कमी आहे म्हणजे याची वैधता 70 दिवसांची आहे, याचा अर्थ असा की किंमती नुसार या दोन्ही प्लान्स मध्ये तुम्हाला तेवढाच डाटा मिळतो.
रिलायंस जियो बद्दल बोलायचे झाले तर या कंपनी ने एवढ्याच डाटा लिमिट सह फक्त Rs 299 च्या किंमतीत आपला एक प्लान लॉन्च केला आहे, पण याची वैधता फक्त 28 दिवसांची आहे. त्यामुळे यूजर्स साठी सध्यातरी हे MTNL चे प्लान्स चांगले म्हणू शकतो.
MTNL च्या STV 421 वाल्या प्लान बद्दल बोलायचे झाले तर यात तुम्हाला रोज 3GB हाई-स्पीड डाटा दिला जाईल, तसेच या प्लान मध्ये तुम्हाला अनलिमिटेड लोकल आणि STD कॉल्स मिळत आहेत. यात रोज 100 SMS फ्री मिळतील. या प्लान ची किंमत तुम्हाला माहित आहे आणि याची वैधता पाहता हा 84 दिवसांच्या वैधते सह येतो.
त्याचबरोबर MTNL STV 365 पाहता या प्लान मध्ये तुम्हाला 3GB रोज डाटा 70 दिवसांसाठी मिळत आहे. तसेच यात पण तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग इत्यादी सह 100 SMS प्रतिदिन पण मिळत आहेत. शेवटी सांगायचे तर कंपनी कडे इतर काही STV प्लान्स पण आहेत, कंपनी कडे त्यांचे STV 231, STV 197 आणि STV 171 प्लान पण आहेत. हे प्लान्स पाहून हेच बोलू शकतो की सध्या जियो च्या प्लान्स पेक्षा चांगल्या ऑफर तुम्हाला दिल्या जात आहेत.