BSNL पाठोपाठ आता MTNL सुद्धा त्याच मार्गाने जाणार आहे आणि त्यासाठी आपल्या ग्राहकांना मोफत रोमिंग सुविधा देण्याची योजना बनवत आहे, लवकरच ही सेवा सुरु होईल.
BSNL पाठोपाठ आता MTNL सुद्धा आपल्या ग्राहकांना मोफत रोमिंग सुविधा देणार आहे. MTNL देशाची प्रमुख शहर राजधानी दिल्ली आणि मुंबईची दूरसंचार काम पाहणारी सरकारी कंपनी आहे. आता MTNL ने अशी घोषणा केली आहे की, ती देशभरात आपल्या ग्राहकांना प्रवासादरम्यान मोफत रोमिंग सेवा देईल. त्यामुळे जर तुम्ही रोमिंगमध्ये असाल, तर तुम्हाला आलेला कॉल तोडून पुन्हा कॉल करण्याची गरज नाही. तुम्ही तो कॉल उचलू शकता, त्यासाठी तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. ह्याआधी BSNLने हे सेवा सुरु केली आहे. सध्यातरी MTNL यूजर्सला दिल्ली किंवा मुंबईच्या बाहेर जाताना हा कॉल उचलण्यासाठी पैसे मोजावे लागणार नाही.
सरकारी सूत्रांनुसार, ह्या योजनेची घोषणा लवकरच केली जाईल, आता त्याच्या तारखेबाबत चर्चा सुरु आहे. सरकारने राष्ट्रीय दूससंचार नीति २०१२ च्या अंतर्गत रोमिंग हळूहळू मोफत करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, ज्याला पुर्ण करण्यासाठी हे एक पुढाकार म्हणून पाहिले जातय, जे हे दोन्ही कंपनी करत आहेत.
ह्या योजनेविषयी दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी संचार तसेच सूचना प्रौद्योगिकी मंत्रालयाशी संबंधित सल्लागार समितीच्या बैठकीदरम्यान सांसदांना सांगितले आहे. त्यांनी सांगितले आहे की, MTNL लवकरच देशात ह्या प्रकारची योजना सुरु करणार आहे.
ह्याआधी जूनमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएलने देशभरात सर्व मोबाईल ग्राहकांना मोफत रोमिंग सेवा सुरु केली होती. आता देशभरात बीएसएनएलचे ग्राहक कुठेही मोफत रोमिंगवर बोलू शकतात. त्यासाठी त्यांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.