तुम्हाला 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 365 दिवसांची वैधता मिळेल, असे सांगितले तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. मात्र आता यावर विश्वास ठेवण्याची वेळ आली आहे. कारण MTNLचा असाच एक प्लॅन आहे, जो 365 दिवसांच्या वैधतेसह फक्त 141 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. मात्र, याशिवाय अन्य कोणत्याही कंपनीकडे अशी कोणतीही योजना आतापर्यंत बघायला मिळाली नाही. जसे आम्ही तुम्हाला सांगितले आहे की, सध्या फक्त MTNL कडेच अशा योजना आहेत परंतु येत्या काळात तुम्हाला अशा योजना नक्कीच मिळतील.
येथे आम्ही तुम्हाला अशाच एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला कमी खर्चात उत्तम बेनिफिट मिळतात. या प्लॅन्समध्ये तुम्हाला कमी किमतीत जास्तीत जास्त फायदे देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. काही रिचार्ज प्लॅन्स MTNL, Reliance Jio, Airtel, Vodafone-Idea किंवा अगदी BSNL द्वारे कमी किमतीत ऑफर केल्या जातात. चला तर जाणून घेऊयात या प्लॅन्सबद्दल सविस्तर माहिती…
MTNLचा 141 रुपयांचा प्लॅन पूर्ण वर्षाच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला डेटा आणि कॉलिंगची सुविधाही मिळेल. यामध्ये तुम्हाला 90 दिवसांसाठी दररोज 1GB डेटा मिळेल. कॉलिंगबद्दल बोलायचे झाल्यास, MTNL नेटवर्क 90 दिवसांसाठी विनामूल्य कॉल ऑफर करते, इतर नेटवर्कवर 200 मिनिटे कॉलिंग उपलब्ध आहे. 90 दिवसांनंतर कॉल करण्यासाठी 0.02 पर सेकंद शुल्क आकारले जाणार आहे.
हे सुद्धा वाचा : Dimensity 810 प्रोसेसरसह Oppo A77 5G स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
वरील रिचार्ज प्लॅनच्या जवळपास Airtelचा 155 रुपयांचा प्लॅन आहे. त्यानंतर Vodafone Idea 149 रुपयांचा प्लॅन ऑफर करते. एअरटेलच्या प्लॅनमध्ये 24 दिवसांसाठी अमर्यादित व्हॉइस कॉलिंगसह एकूण 1GB डेटा मिळतो. तर दुसरीकडे, Vodafone Idea च्या प्लॅनमध्ये 21 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग आणि 1GB डेटा मिळतो.
MTNLच्या रिचार्ज प्लॅनच्या जवळपास रिलायन्स जिओचा 149 रुपयांच्या प्लॅन आहे. यामध्ये तुम्हाला फक्त 20 दिवसांची वैधता मिळेल. या प्लॅनअंतर्गत, ग्राहकांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMSचा लाभ मिळेल. त्याबरोबरच इंटरनेट वापरण्यासाठी तुम्हाला दररोज 1GB डेटा मिळणार आह. प्लॅनची वैधता 20 दिवसांची आहे, म्हणजेच Jio आपल्या ग्राहकांना 149 रुपयांमध्ये एकूण 20GB डेटा देत आहे.