अविश्वसनीय ! फक्त 141 रुपयांमध्ये वर्षभराच्या रिचार्जची सुट्टी, मोफत कॉल आणि दररोज इंटरनेट

अविश्वसनीय ! फक्त 141 रुपयांमध्ये वर्षभराच्या रिचार्जची सुट्टी, मोफत कॉल आणि दररोज इंटरनेट
HIGHLIGHTS

कमीत कमी किमतीत वर्षभराची वैधता मिळवा

MTNL चा 141 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1 GB डेटा आणि मोफत कॉलिंग मिळेल.

आज आम्ही तुम्हाला अविश्वसनीय प्लॅन सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला फक्त 141 रुपयांमध्ये 365 दिवसांची वैधता मिळेल. खर्च विश्वास बसत नाही ना ? पण आज खर्च आम्ही तुमच्यासाठी असा स्वस्त प्रीपेड प्लॅन शोधला आहे, जो फक्त 141 रुपयांमध्ये 365 दिवसांची वैधता मिळणार आहे. 

हे सुद्धा वाचा : Tecno Pop 7 Pro बजेट स्मार्टफोन बाजरात दाखल, किंमत फक्त 6,799 रुपये

तुम्ही सरकारी टेलिकॉम कंपनी MTNL चे नाव ऐकले असेल. BSNL प्रमाणेच MTNL देखील स्वस्त रिचार्ज प्लॅन ऑफर करते. आम्ही तुम्हाला सांगतो की MTNL फक्त 141 रुपयांमध्ये 365 दिवसांची वैधता ऑफर करते, म्हणजेच तुम्ही 141 रुपयांचा रिचार्ज केल्यास, तुमचा नंबर वर्षभर सक्रिय राहील.

MTNL चा 141 रुपयांचा प्लॅन 

या प्लॅनमध्ये युजर्सना केवळ दीर्घ वैधताचं मिळत नाही, तर या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1 GB डेटाही मिळेल.  पण लक्षात घ्या की, प्रतिदिन 1 GB डेटाचा फायदा फक्त सुरुवातीच्या 90 साठी मिळणार आहे. डेटा व्यतिरिक्त, तुम्हाला MTNL नंबरवर अमर्यादित कॉलिंग मिळेल.

 मात्र, तुम्ही इतर नेटवर्कवर कॉल केल्यास, तुम्हाला या प्लॅनमध्ये 200 मिनिटे म्हणजेच 100 लोकल मिनिटे आणि 100 STD मिनिटे मोफत दिली जातील. मोफत मिनिटांचा लाभ संपल्यानंतर, कॉलिंगसाठी पहिल्या 90 दिवसांसाठी 25 पैसे प्रति मिनिट आणि 90 दिवसांनंतर 0.02 प्रति सेकंद दराने शुल्क आकारले जाईल. दराने शुल्क आकारले जाईल. असा प्लॅन रिलायन्स JIO, AIRTEL आणि VI कडे तुम्हाला बघायला अजिबात मिळणार नाही. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo