Airtel ने गेल्या महिन्यात भारी बेनिफिट्ससह एक नवीन डेटा पॅक लाँच केला होता. कंपनीने हा पॅक 99 रुपयांच्या किंमतीत लाँच केला होता. विशेष म्हणजे, हा प्लॅन खासकरून अशा लोकांसाठी आहे जे जास्त इंटरनेट डेटा वापरतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, आता कंपनीने हा प्लॅन अपडेट केला आहे, त्यानंतर त्यामध्ये पूर्वीपेक्षा जास्त फायदे मिळू लागले आहेत. पण हा प्लॅन आता तुमच्यासाठी किफायतशीर आहे का?
अलीकडेच लाँच झालेल्या Airtel च्या 99 रुपयांच्या नवीन डेटा पॅक प्लॅनची वैधता पूर्वी केवळ एक दिवसाची वैधता होती. मात्र, आता ही वैधता दोन दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे. होय, या प्लॅनमध्ये वैधता वाढवण्यात आली आहे. मात्र या प्लॅनमधील एक खास बेनिफिट कमी करण्यात आला आहे. तो म्हणजे, याआधी प्लॅनमध्ये उपलब्ध कमाल डेटा 30GB होता. पण, आता युजर्सना जास्तीत जास्त 20GB डेटाचा लाभ मिळणार आहे.
म्हणजेच या प्लॅनमध्ये तुम्ही आता 48 तास जास्तीत जास्त 20GB डेटाचा आनंद घेऊ शकाल. त्याच वेळी, 20GB पेक्षा जास्त डेटा वापरल्यानंतर, इंटरनेटचा वेग कमी होऊन 64kbps होईल. याचा अर्थ, जर तुम्हाला कोणत्याही दिवशी अधिक डेटाची आवश्यकता असेल, तर तुम्ही एअरटेलच्या 99 रुपयांच्या प्लॅन रिचार्ज करू शकता. लक्षात घ्या की, हा केवळ एक डेटा पॅक आहे, या प्लॅनमध्ये व्हॉईस कॉलिंग आणि मेसेजिंग सुविधा उपलब्ध नाहीत.
महत्त्वाचे लक्षात घ्या की, Airtel आपल्या वापरकर्त्यांना अमर्यादित 5G डेटा देखील ऑफर करत आहे. जर तुम्ही 5G डेटा नेटवर्क असलेल्या क्षेत्रात राहत असाल आणि तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असेल, ज्यामध्ये 5G नेटवर्क सपोर्ट अपडेट केला गेला असेल, तर तुम्ही अमर्यादित 5G डेटाचा आनंद घेऊ शकता.
Airtel च्या पॉप्युलर डेटा पॅकची सुरुवातीची किंमत 58 रुपये आहे, ज्यामध्ये युजर्स 3GB डेटा मिळतो. त्यानंतर 65 रुपयांच्या प्लॅनमध्ये 4GB डेटा, 98 रुपयांच्या प्लॅनमध्ये 5GB डेटा आणि विंक म्युझिक प्रीमियम सबस्क्रिप्शन आहे. 118 रुपयांच्या प्लॅनमध्ये 12GB डेटा, 148 रुपयांच्या प्लॅनमध्ये 15GB डेटा, 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30 दिवसांसाठी 1GB डेटा आणि Airtel Extreme सदस्यता आणि 301 रुपयांच्या प्लॅनमध्ये 50GB डेटा उपलब्ध आहे.