Airtel OTT Plans: रसिक प्रेक्षकांसाठी सब्स्क्रिप्शनसह येणारे Best प्लॅन्स, एन्जॉय करा सर्वोत्तम चित्रपट आणि सिरीज। Tech News

Updated on 28-Feb-2024
HIGHLIGHTS

Airtel ने OTT सब्स्क्रिप्शनसह अनेक प्लॅन्स सादर केले आहेत.

आम्ही तुम्हाला 700 रुपयांच्या अंतर्गत येणाऱ्या प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत.

499 रुपयांचा प्लॅनमध्ये Disney+ Hotstar Mobile चे 3 महिन्यांचे सबस्क्रिप्शन मिळेल.

भारतातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी Airtel ने OTT सब्स्क्रिप्शनसह अनेक प्लॅन्स सादर केले आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही अशाच काही रिचार्ज प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, जे OTT सबस्क्रिप्शनसह येतात. एवढेच नाही तर, आम्ही तुम्हाला 700 रुपयांच्या अंतर्गत येणाऱ्या प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनेक OTT प्लॅटफॉर्मचा ऍक्सेस मिळणार आहे. आम्ही तुमच्यासाठी काही निवडक प्लॅन्सची यादी तयार केली आहे. या प्लॅन्समध्ये Airtel Xstream Play, Disney+ Hotstar, Amazon Prime Video आणि इतरांचा मोफत ऍक्सेस समाविष्ट आहे. बघा यादी-

Airtel चा 359 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये ग्राहकांना 359 रुपयांच्या किमतीत अनलिमिटेड कॉलिंगची ऑफर दिली जात आहे. याशिवाय, प्लॅनमध्ये दररोज 100SMS आणि दररोज 2.5GB डेटाचा लाभही उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित 5G डेटाही दिला जात आहे. हा प्लॅन संपूर्ण एका महिन्याच्या वैधतेसह ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. प्लॅनसह Airtel Xstream Play सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे, ज्यामध्ये 20+ OTT प्लॅटफॉर्मचा लाभ मिळेल.

airtel OTT Recharge Plans

Airtel चा 399 रुपयांचा प्लॅन

Airtel च्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉलिंग मिळेल. याशिवाय, प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 3GB डेटाही दिला जात आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 100 SMS ही मिळतात. प्लॅन अपोलो 24/7 सर्कल, फ्री हेलोट्यून्स आणि विंक म्युझिक ऍक्सेससह अमर्यादित 5G इंटरनेट ऑफर करतो. हा प्लॅन संपूर्ण ​28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये देखील ग्राहकांना Airtel Xstream Play चे फायदे मिळतात.

Airtel चा 499 रुपयांचा प्लॅन

Airtel च्या या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉलिंग मिळेल. याशिवाय, प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा, 100 SMS देखील मिळतात. या प्लॅनची ​​वैधता देखील पूर्ण 28 दिवसांसाठी उपलब्ध आहे. याशिवाय, या प्लॅनमध्ये ग्राहकांना Disney+ Hotstar Mobile चे 3 महिन्यांचे सबस्क्रिप्शन मिळते. प्लॅनमध्ये ग्राहकांना Airtel Xstream Play चा 28 दिवसांसाठी आणि अमर्यादित 5G डेटाचा लाभ देखील मिळतो.

Airtel चा 699 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटासोबत 100 SMS देखील मिळतात. हा प्लॅन 56 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉलिंग देखील मिळते. या प्लॅनमध्ये उपलब्ध OTT बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये Amazon Prime Video चा ॲक्सेस 56 दिवसांसाठी उपलब्ध आहे. त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा देखील मिळणार आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :