Jio ने काही काळापूर्वी JioTV Premium प्लॅन लाँच केले होते. या प्लॅनची किंमत 148 रुपये, 398 रुपये, 1198 रुपये आणि 4498 रुपये इतकी आहे. या युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आता कंपनी या प्लॅन्सअंतर्गत बोनस डेटा देत आहे. वापरकर्त्यांना बोनस डेटाच्या रूपात अतिरिक्त डेटा ऍक्सेस देखील दिला जात आहे. आम्ही तुम्हाला सांगतो, कंपनीचा JioTV Premium प्लॅन एकाच वेळी अनेक OTT ॲप्सचे सबस्क्रिप्शन ऑफर करतो. तुम्ही मनोरंजनासाठी असाच एखादा प्लॅन शोधत असाल, तर JioTV Premium तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरतो.
हे सुद्धा वाचा: Jio AirFiber Booster Pack: कंपनीने सादर केले दोन नवीन बूस्टर पॅक, मिळेल 500GB पर्यंत हाय-स्पीड डेटा। Tech News
कंपनी 1198 रुपयांच्या JioTV प्रीमियम प्लॅनसह बोनस डेटा देत आहे. या प्लॅनच्या बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटाचा ऍक्सेस मिळतो. त्यानुसार या प्लॅनमध्ये तुम्हाला संपूर्ण वैधतेदरम्यान 168GB डेटा मिळेल. JioTV प्रीमियम बोनस डेटाबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी या प्लॅनसह 18GB बोनस डेटा देत आहे.
बोनस डेटा अंतर्गत या प्लॅनमध्ये एकूण 186GB डेटाची सुविधा मिळणार आहे. दैनंदिन डेटा कोटा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग @ 64 Kbps पर्यंत कमी होतो. तसेच, कंपनीचा हा प्लॅन 5G डेटा ऑफर करतो. या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची आणि दररोज 100 मोफत SMS ची सुविधा मिळते. लक्षात घ्या की, तुम्हाला अतिरिक्त डेटा लाभ फक्त Jio ॲपद्वारे रिचार्ज केल्यावरच मिळतील.
विशेषतः JioTV प्रीमियम प्लॅन वापरकर्त्यांना एकाच वेळी अनेक OTT ॲप्सची मेंबरशिप प्रदान करते. 1198 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकाच वेळी 12 OTT ॲप्सचे सबस्क्रिप्शन उपलब्ध असेल. यामध्ये Prime Video मोबाईल, Disney+Hotstar, SonyLIV, ZEE5, JioCinema Premium, Lionsgate Play, Discovery +, DocuBay, EpicON, SunNXT, Hoichoi, Chaupal, Planet Marathi आणि Kanchha Lannka इ. ऍप्स मिळतील.
प्लॅनमध्ये JioTV आणि JioCloud सुविधा देखील या प्लॅनमध्ये समाविष्ट आहेत. वैधतेबद्दल बोलायचे झाल्यास, Disney+Hotstar सबस्क्रिप्शन प्लॅनमध्ये 3 महिन्यांपर्यंत उपलब्ध आहे. तसेच, प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन आणि JioCinema प्रीमियमची सदस्यता 84 दिवसांपर्यंत वैध आहे.