जर तुम्ही Jio चा 100 रुपयांपेक्षा कमी प्लॅन शोधत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी Jio चा प्रीपेड प्लॅन घेऊन आलो आहोत. हा प्लॅन केवळ 91 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये, दैनंदिन डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि SMS यांसारख्या बेनिफिट्ससोबत, मनोरंजनाचे फायदे देखील उपलब्ध आहेत. याबरोबरच, VI आणि AIRTEL या बजेटमध्ये Jio च्या 91 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनच्या तुलनेत कोणते फायदे देतात, ते सुद्धा बघुयात…
हे सुद्धा वाचा : 5G: नव्या पर्वाला लवकरच होणार सुरुवात, हाय कॉलिटी फिल्म्स फक्त काही सेकंदात होणार डाउनलोड
Jio च्या 91 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 100MB डेटा दिला जातो. याशिवाय 200MB अतिरिक्त डेटा देखील दिला जातो. हाय स्पीड डेटा मर्यादा गाठल्यानंतर इंटरनेट स्पीड 64 Kbps पर्यंत कमी केला जातो. या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. तसेच, यामध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 50 SMS उपलब्ध आहेत. इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर या प्लॅनमध्ये Jio ऍप्सचे फ्री सब्सक्रिप्शन देखील उपलब्ध आहे.
Vodafone Idea च्या 98 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये एकूण 200MB डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये 15 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे. मात्र, यामध्ये कोणताही मोफत SMS उपलब्ध नाही.
एअरटेलच्या 99 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये एकूण 200MB डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता आहे. या प्लॅनमध्ये 99 रुपयांचा टॉकटाइम उपलब्ध आहे. कॉलिंग चार्जेस 2.5 पैसे प्रति सेकंद आणि STD SMS साठी 1.5 रुपये आणि स्थानिक SMS शुल्क 1 रुपये आहे.