Jioचे तीन नवीन पोस्टपेड प्लॅन, यासोबत JioFi 4G वायरलेस हॉटस्पॉट मिळेल फ्री

Jioचे तीन नवीन पोस्टपेड प्लॅन, यासोबत JioFi 4G वायरलेस हॉटस्पॉट मिळेल फ्री
HIGHLIGHTS

249 रुपये, 299 रुपये आणि 349 रुपयांचे JioFi पोस्टपेड रिचार्ज प्लॅन

प्लॅन्स अंतर्गत ग्राहकांना मोफत पोर्टेबल JioFi डिव्हाइसेसचा लाभ मिळेल.

JioFi डिव्हाइसेस वापरल्यानंतर परत देण्याच्या अटीवर उपलब्ध.

Jio आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी नेहमीच नवनवीन रिचार्ज प्लॅन आणत असते.  रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी पुन्हा एकदा गिफ्ट आणले आहे. 3 नवीन मासिक पोस्टपेड प्लॅन्सच्या खरेदीवर JioFi 4G वायरलेस हॉटस्पॉट मोफत मिळणार आहे. या प्लॅनची ​​किंमत 249 रुपये, 299 रुपये आणि 349 रुपये आहे. तिन्ही प्लॅनमध्ये डेटा मर्यादा वेगवेगळी असणार आहे. 

यातील सर्वात स्वस्त म्हणजेच बेस प्लान 30GB डेटासह येतो. त्याचप्रमाणे,  40GB आणि 50GB डेटा अनुक्रमे 299 आणि 349 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये उपलब्ध आहे. तिन्ही प्लॅन्स 1 महिन्याच्या वैधतेसह उपलब्ध आहेत. यासह 18 महिन्यांचा लॉक-इन कालावधी देखील असेल. तसेच, या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना कोणत्याही प्रकारचा व्हॉईस कॉलिंग किंवा SMSचा लाभ मिळणार नाही. या प्लॅन्स अंतर्गत ग्राहक मोफत पोर्टेबल JioFi डिव्हाइसेसचा लाभ घेऊ शकतात. हे उपकरण वापरल्यानंतर परत देण्याच्या अटीवर उपलब्ध असेल.

Jio च्या वेबसाइटनुसार, 249 रुपयांच्या नवीन पोस्टपेड रिचार्ज प्लॅनमध्ये एका महिन्याच्या वैधतेसह 30GB डेटा मिळतो. 299 रुपयांच्या पोस्टपेड रिचार्ज प्लॅनमध्ये 40GB डेटा उपलब्ध आहे आणि 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये 50GB डेटा उपलब्ध आहे. प्रत्येक प्लॅन 1 महिन्याच्या वैधतेसह येईल. डेटा मर्यादा पूर्ण झाल्यानंतर, इंटरनेट स्पीड 64kbps पर्यंत कमी होईल.

JioFi 4G वायरलेस पोर्टेबल हॉटस्पॉट 

 249 रुपये, 299 रुपये आणि 349 रुपयांचा JioFi पोस्टपेड रिचार्ज प्लॅन निवडणार्‍या ग्राहकांना JioFi 4G वायरलेस पोर्टेबल हॉटस्पॉट मोफत मिळेल. हे उपकरण वापरून नंतर ग्राहकांना परत करावे लागेल.  मात्र, व्हॉईस कॉलिंग आणि SMSचे फायदे या पैकमध्ये मिळणार नाहीत. JioFi 4G वायरलेस हॉटस्पॉट नॅनो सिमला सपोर्ट करतो. यामध्ये एका वेळी 10 उपकरणे कनेक्ट करता येतील, असे देखील सांगण्यात आले आहे. JioFi 4G हॉटस्पॉट डिव्हाइसला कनेक्टिव्हिटीसाठी मायक्रो-USB पोर्ट आणि एक microSD कार्ड स्लॉट मिळतो. यात 2,300mAh बॅटरी आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo