कंपनी JioCinema प्रीमियम अंतर्गत 29 आणि 89 रुपयांचे दोन प्लॅन ऑफर करते.
फॅमिली प्लॅनसह युजर्स JioCinema Premium ऍप तब्बल 4 डिव्हाइसवर स्ट्रीम करण्यास सक्षम
Reliance Jio ने अलीकडे JioCinema Premium चे स्वस्त सबस्क्रिप्शन प्लॅन लाँच केले आहेत. आता कंपनीने या प्लॅन्समध्ये एक नवीन डिस्काउंट ऑफर आणली आहे. सवलतीनंतर तुम्ही आता आणखी स्वस्त दरात JioCinema प्रीमियम प्लॅन ऍक्टिव्ह करू शकता. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, ही ऑफर सध्या फक्त JioCinema प्रीमियम फॅमिली प्लॅनवर लागू करण्यात आली आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने काही काळापूर्वी हा प्लॅन फक्त 89 रुपयांमध्ये लाँच केला होता. आता हा प्लॅन डिस्काउंट ऑफरसह कमी किमतीत खरेदी करता येईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात ऑफर्सचे तपशील-
JioCinema Premium Family Plan
JioCinema प्रीमियम फॅमिली पॅकबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने हा प्लॅन आधी 89 रुपयांच्या किमतीत लाँच केला होता. मात्र, आता कंपनीने या प्लॅनवर तब्बल 13 रुपयांची डिस्काउंट ऑफर आणली आहे. या ऑफरसह आता तुम्ही हा प्लॅनची केवळ 76 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही JioCinema ॲप आणि वेबसाइटद्वारे या ऑफरचा लाभ घेऊ शकता.
JioCinema Premium Family प्लॅनचे बेनिफिट्स
लक्षात घ्या की, कंपनी JioCinema प्रीमियम अंतर्गत 29 आणि 89 रुपयांचे दोन प्लॅन ऑफर करते. या दोन्ही प्लॅन्समध्ये वापरकर्त्यांना ऍड-फ्री स्ट्रीमिंग एक्सपेरियन्स मिळेल. याव्यतिरिक्त, प्रीमियम सबस्क्रिप्शनसह वापरकर्ते JioCinema वर 4K कॉलिटीमध्ये HBO कंटेंटचा आनंद घेऊ शकतात. फॅमिली प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 1 महिन्याचे सबस्क्रिप्शन मिळेल. मात्र, या प्लॅनसह तुम्ही JioCinema Premium ऍप तब्बल 4 डिव्हाइसवर स्ट्रीम करण्यास सक्षम असाल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.