IPL 2024: आता येईल खरी मजा! JioCinema घेऊन येत आहे नवीन ‘Ad-Free’ प्लॅन, ‘या’ दिवशी होणार लाँच। Tech News 

IPL 2024: आता येईल खरी मजा! JioCinema घेऊन येत आहे नवीन ‘Ad-Free’ प्लॅन, ‘या’ दिवशी होणार लाँच। Tech News 
HIGHLIGHTS

JioCinema इंडियन प्रीमियर लीग IPL 2024 मोफत प्रवाहित होत आहे.

JioCinema वर हा प्लॅन 25 एप्रिल रोजी सादर केला जाईल.

Jio Cinema सबस्क्रिप्शन प्लॅनची ​​किंमत प्रति वर्ष 999 रुपये आहे.

JioCinema वर सध्या क्रिकेट विश्वातील सर्वात मोठा उत्सव इंडियन प्रीमियर लीग IPL 2024 मोफत प्रवाहित होत आहे. जे लोक JioCinema वर T-20 सामने पाहत आहेत, त्यांना अनेकदा जाहिराती देखील बघाव्या लागतात. जाहिरातींमुळे सामने बघण्याची मजा खराब होते. दरम्यान, आता JioCinema ने एक नवीन सबस्क्रिप्शन प्लॅन टीज केले आहे. या सबस्क्रिप्शनसह युजर्सना सतत येणाऱ्या जाहिराती बघाव्या लागणार नाही. कंपनीने नुकतेच म्हणजे 21 एप्रिल रोजी आपल्या X हँडलवर नव्या सबस्क्रिप्शनबाबत जाहिरात पोस्ट केली होती.

हे सुद्धा वाचा: Airtel Plans: Unlimited डेटासह येतात प्रसिद्ध टेलिकॉम दिग्गजचे जबरदस्त प्लॅन्स, किंमत 50 रुपयांपेक्षा कमी

JioCinema नवीन सब्स्क्रिप्शन प्लॅन

Jio Cinema च्या नव्या प्लॅनबद्दल अधिक तपशील अजूनही पडद्याआड आहेत. परंतु नवीनतम जाहिरात म्हणजेच वरील पोस्ट सूचित करते की, कंपनी जाहिराती काढून टाकण्यासाठी एक वेगळा स्तर सादर करण्याची योजना आखत आहे. पोस्टमध्ये तुम्ही बघू शकता की, हा प्लॅन 25 एप्रिल रोजी सादर केला जाईल.

JioCinema प्लॅन्स

सध्या, Jio Cinema सबस्क्रिप्शन प्लॅनची ​​किंमत प्रति वर्ष 999 रुपये आहे. त्याबरोबरच, वापरकर्ते 99 रुपयांमध्ये मासिक प्लॅन देखील खरेदी करू शकतात. जिओ सिनेमा प्रीमियम सबस्क्रिप्शनच्या बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये “JioCinema बेस्ट ऑफ हॉलीवूड प्लॅन” HBO आणि इतर चॅनेलवरील प्रीमियम कंटेंटचा ऍक्सेस मिळेल. याव्यतिरिक्त, वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये सर्वाधिक व्हिडिओ आणि ऑडिओ समर्थनासह 4 डिव्हाइससाठी सपोर्ट देखील मिळेल.

JioCinema New Plan for IPL 2024
JioCinema New Plan for IPL 2024

तुमच्या माहितीसाठी सांगतो की, या वर्षाच्या सुरुवातीला रिलायन्स इंडस्ट्रीज आणि Walt Disney मर्ज केले गेले. त्यानंतर, दोन्ही कंपन्यांनी संयुक्त उपक्रम म्हणजेच जॉईंट व्हेंचर JV स्थापन करून त्यांचे इंडिया टीव्ही कंटेंट आणि स्ट्रीमिंग मीडिया एसेट्स एकत्र आणण्याचे मान्य केले. कंपनीने सांगितले की, ” मनोरंजन आणि क्रीडा सामग्रीसाठी आयकॉनिक मीडिया एसेट्सना एकत्र आणून भारतात मनोरंजन आणि स्पोर्ट कंटेंटसाठी आघाडीचे लिडिंग TV आणि डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मपैकी एक बनणे” असे या JV उद्दिष्ट आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo