सध्या क्रिकेटविश्वातील एक मोठा उत्सव सुरु आहे, तो म्हणजे IPL 2023 होय. IPL 2023 क्रिकेट लव्हर्ससाठी JioCinema वर थेट प्रवाहित होत आहे. JioCinema आता युजर्ससाठी अगदी मोफत आहे. पण, एक बातमी तुमच्यासाठी निराशाजनक असू शकते. ते म्हणजे JioCinema वर कंटेंट बघणे यापुढे मोफत राहणार नाही.
कंपनी लवकरच यासाठी पेड सब्सक्रिप्शन आणण्याची योजना आखत आहे. पण आता प्रश्न असा येतो की, IPL बघण्यासाठी प्रेक्षांना पैसे द्यावे लागणार आहेत का? तर नाही. कंपनी IPL 2023नंतर पेड सब्सक्रिप्शन आणू शकते.
IPL 2023 सध्या जोरात सुरु आहे, प्रेक्षकांकडून नेहमीच या उत्सवाला जोरदार प्रतिसाद मिळत असतो. या सिझनचा शेवटचा सामना 28 मे 2023 रोजी खेळला जाणार आहे. यानंतर वर सांगितल्याप्रमाणे, JIO आपल्या ग्राहकांकडून शुल्क घेणार आहे.
एका मुलाखतीमध्ये कंपनीच्या मीडिया आणि कंटेंट बिजनेस प्रेसिडेंट ज्योती देशपांडे यांनी एका इंटरव्यूमध्ये सांगितले की, JioCinema आपल्या प्लॅटफॉर्मवर 100 पेक्षा जास्त चित्रपट आणि टीव्ही सिरीज जोडण्याची तयारी करत आहे. अशाप्रकारे कंपनी प्रमुख OTT प्लॅटफॉर्मना टक्कर देणार आहे, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
JIO ने दररोज 3GB डेटासह एक्सट्रा डेटा ऍड-ऑन पॅक आणि विशेष व्हाउचरसह क्रिकेट प्लॅन्स लाँच केले आहेत. JIO ने ग्राहकांच्या सुविधांसाठी 222 रुपये, 444 रुपये आणि 667 रुपयांचे 3 क्रिकेट ऍड ऑन प्लॅन्स लाँच केले आहेत.