JioAirfiber Launching: नव्या सर्व्हिससह मिळेल 1Gbps पर्यंत टॉप स्पीड, बघा किंमत आणि Jio Fiber पेक्षा किती असेल वेगळा?

JioAirfiber Launching: नव्या सर्व्हिससह मिळेल 1Gbps पर्यंत टॉप स्पीड, बघा किंमत आणि Jio Fiber पेक्षा किती असेल वेगळा?
HIGHLIGHTS

Jio AirFiber टेक्नॉलॉजीसह 1.5 Gbps पर्यंत इंटरनेट स्पीड मिळेल.

यात पॅरेंटल कन्ट्रोल, Wi-Fi 6 आणि इंटग्रेटेड सिक्योरिटी फायरवॉल प्रदान केले जाईल.

हे नियमित ब्रॉडबँड कनेक्शनपेक्षा थोडे अधिक महाग असू शकते.

रिलायन्स Jioने अलीकडेच एका नव्या सर्व्हिसबद्दल घोषणा केली होती. अखेर उद्या म्हणजेच 19 सप्टेंबर 2023 रोजी गणेश चतुर्थीला Jio AirFiber लाँच केले जाईल. Jio AirFiber ही Jio ची वायरलेस इंटरनेट सेवा आहे. ज्यामध्ये 5G तंत्रज्ञानाचा वापर करून हायस्पीड इंटरनेट सुविधा प्रदान करण्यात आली आहे. यामुळे 1Gbps चा हायस्पीड इंटरनेट स्पीड मिळेल, असा कंपनीचा दावा आहे. 

आम्ही तुम्हाला सांगतो की, यात पॅरेंटल कन्ट्रोल, Wi-Fi 6 आणि इंटग्रेटेड सिक्योरिटी फायरवॉल प्रदान केले जाईल. 

Jio AirFiber ची संभावित किंमत 

jio airfiber

Jio AirFiber ची किंमत सुमारे 6,000 रुपये असण्याची शक्यता आहे. हे नियमित ब्रॉडबँड कनेक्शनपेक्षा थोडे अधिक महाग असू शकते. खरं तर, Jio AirFiber एक डायरेक्ट प्लग-अँड-प्ले सोल्यूशन म्हणून डिझाइन केले आहे, जे वापरकर्त्यांना शक्य तितके सोप्या पद्धतीने नेटवर्क ऍक्सेस देईल. Jio Fiber ला सामान्यतः व्यावसायिक इंस्टॉलेशनची आवश्यकता असते. 

Jio AirFiber ची स्पीड 

Jio AirFiber टेक्नॉलॉजीसह 1.5 Gbps पर्यंत इंटरनेट स्पीड मिळेल. Jio AirFiber ची खरी स्पीड तुम्ही AirFiber च्या नेटवर्कपासून किती अंतरावर आहेत, यावर अवलंबून असेल. जिओ फायबर देशभरात उपलब्ध नाही, तर  Jio AirFiber चे वायरलेस टेक्नॉलॉजी अधिक कव्हरेज प्रदान करेल.

Jio AirFiber सर्व्हिस JioFiber पेक्षा किती वेगळी असेल? 

जिओ फायबरला सहसा व्यावसायिक इंस्टॉलेशनची आवश्यक असते. Jio Fiber च्या विपरीत Jio Air Fiber मध्ये नेटवर्क कव्हरेजसाठी वायर्ड फायबर ऑप्टिक केबल वापरली जाते. आम्ही तुम्हाला सांगतो की, Jio AirFiber पॉइंट-टू-पॉइंट रेडिओ लिंक वापरून वायरलेस सेवा देते. म्हणजेच, Jio AirFiber वायरलेस सिग्नलद्वारे काम करतो. Jio AirFiber खरं तर Jio सह घरे आणि कार्यालयांमध्ये थेट कनेक्शन सेटअप करतो. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo