रिलायन्स Jio आणि VI यांच्यात आपल्याला नेहमीच स्पर्धा बघायला मिळते. दोन्ही कंपन्या वापरकर्त्यांना सर्वोत्तम रिचार्ज प्लॅन्स देखील देत आहेत. मात्र, Vodafone कडे असा एक पोस्टपेड प्लॅन आहे, जो डेटा फायद्यांच्या बाबतीत Jio च्या 399 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनपेक्षा खूप पुढे आहे. Vodafone-Idea या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 150 GB अतिरिक्त डेटा देत आहे. मात्र, जिओच्या या प्लॅनमध्ये हा बेनिफिट नाही. पण , OTT फायद्यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर, jio निश्चितपणे Vodafone-Idea पेक्षा पुढे आहे. वाचा सविस्तर…
हे सुद्धा वाचा : Google Mapsचे Street View फीचर भारतात लाँच, आता मॅप्स वापरण्याची पद्धत बदलणार
Vodafone-Idea च्या या पोस्टपेड प्लॅनमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी 40 GB डेटा मिळेल. तुम्ही या प्लॅनची ऑनलाइन सदस्यता घेतल्यास म्हणजेच सबस्क्राईब केल्यास, तुम्हाला 150GB अतिरिक्त डेटा मोफत मिळेल. कंपनी या प्लॅनमध्ये 200 GB पर्यंत डेटा रोलओव्हर बेनिफिट देखील देत आहे. या प्लॅनमध्ये मंथली 100 मोफत SMS आणि देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंग देखील उपलब्ध असेल. कंपनी या प्लॅनच्या सदस्यांना Zee5 प्रीमियम सोबत Vi Movies आणि TV ऍपचे VIP सबस्क्रिप्शन ऑफर करत आहे.
JIO चा हा सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी एकूण 75 GB डेटा मिळेल. डेटा लिमिट संपल्यानंतर तुम्हाला 1 GB डेटासाठी 10 रुपये द्यावे लागतील. प्लॅनमध्ये 200 GB डेटा रोलओव्हरचा लाभही दिला जात आहे. या प्लॅनमध्ये देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंग देखील उपलब्ध आहे. त्याबरोबरच, दररोज 100 मोफत SMS मिळतील. Jio च्या या प्लॅनमध्ये तुम्हाला Netflix, Amazon Prime Video आणि Disney + Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळेल.