Jio vs Airtel: अमर्यादित कॉल आणि बंपर डेटासह स्वस्त रिचार्ज, कोणाचा प्लॅन आहे सर्वोत्तम ?
AIRTEL आणि JIOचा 299 रुपयांचा प्लॅन
जिओच्या 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2 GB डेटा उपलब्ध
एअरटेलच्या या प्लॅनमध्ये दररोज 1.5 GB डेटा उपलब्ध
रिलायन्स Jio ने सुरुवातीपासूनच बाजारात परवडणाऱ्या किमतींसह रिचार्ज प्लॅन्स आणले आहेत. Airtel आणि Vodafone Idea (Vi) ने देखील Jio ने टेलिकॉम उद्योगात प्रवेश केल्यानंतरच त्यांच्या ग्राहकांसाठी परवडणाऱ्या योजना उपलब्ध करून दिल्या. आज आम्ही तुम्हाला रिलायन्स जिओ आणि एअरटेलच्या 299 रुपयांच्या प्लॅनबद्दल सर्व काही सांगणार आहोत. जिओ आणि एअरटेलच्या 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये कोण अधिक फायदे देत आहे? चला जाणून घेऊया कोणाची योजना सर्वोत्तम आहे?
हे सुद्धा वाचा : अवघ्या काही वेळातच फुल चार्ज होईल स्मार्टफोन, 4 टिप्समध्ये वाढेल स्पीड, फक्त 'या' सेटिंग्ज बदला
एअरटेलचा 299 रुपयांचा प्लॅन
एअरटेलच्या 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल, STD आणि रोमिंग कॉल्स देण्यात आले आहेत. हा कॉल देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर विनामूल्य आहे. प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 100 SMS दिले जातात. प्लॅनमध्ये उपलब्ध हाय-स्पीड डेटा संपल्यानंतर, स्पीड 64Kbps पर्यंत घसरतो.
299 रुपयांच्या एअरटेल प्लॅनमध्ये, Xstream मोबाइल पॅकची सदस्यता 28 दिवसांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे. याशिवाय, या स्वस्त प्रीपेड प्लॅनमध्ये Fastag वर 100 कॅशबॅक आणि मोफत HelloTunes सुविधा देखील उपलब्ध आहे. विंक म्युझिकचा लाभही मोफत घेता येईल.
रिलायन्स जिओचा 299 रुपयांचा प्लान
299 रुपयांच्या Jio प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. या प्लानमध्ये दररोज 2 GB डेटा मिळतो. दररोज प्राप्त होणारा डेटा संपल्यानंतर, वेग 64Kbps पर्यंत घसरतो. याशिवाय या प्रीपेड पॅकमध्ये दररोज अमर्यादित व्हॉईस कॉल आणि 100 SMS उपलब्ध आहेत. म्हणजेच, जिओ ग्राहक कोणतेही पैसे न भरता देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर लोकल, STD आणि रोमिंग कॉलचा लाभ घेऊ शकतात.
रिलायन्स जिओची ही परवडणारी योजना JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन देते. 299 रुपयांचा प्लॅन जिओचा सर्वाधिक विकला जाणारा प्लॅन आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile