digit zero1 awards

रिलायन्स JIO आणि AIRTEL च्या 2,999 रुपयांचा प्लॅन, बघा कोण देत आहे जबरदस्त बेनिफिट्स

रिलायन्स JIO आणि AIRTEL च्या 2,999 रुपयांचा प्लॅन, बघा कोण देत आहे जबरदस्त बेनिफिट्स
HIGHLIGHTS

JIO आणि AIRTEL च्या 2,999 रुपयांच्या प्लॅनमधील फरक

JIO च्या प्लॅनमध्ये 23 दिवसांची अतिरिक्त वैधता उपलब्ध आहे.

AIRTEL चा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो.

Reliance Jio आणि Airtel या दोन्ही दूरसंचार उद्योगातील दिग्गज त्यांच्या ग्राहकांना चांगल्या नेटवर्कसह उत्तम रिचार्ज प्लॅन्स ऑफर करतात. बरेचदा, दोन्ही कंपन्या एकाच किंमतीत एकापेक्षा जास्त फायदे देऊ शकतात. दर महिन्याला रिचार्ज करताना आपल्याला वैताग येतो. त्यामुळेच कधी कधी तीन महिने तर कधी सहा महिन्यांसाठी रिचार्ज करतो. 

आज आपण दोन्ही कंपन्यांच्या अशाच एका दीर्घकालीन रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत. 2,999 रुपयांच्या एकाच किमतीत Jio आणि Airtel किती वेगवेगळे फायदे देतात ते बघुयात… 

हे सुद्धा वाचा : WhatsApp ने आणले अप्रतिम फीचर ! स्टेटस रिपोर्टसह मिळतील अनेक जबरदस्त फीचर्स

RELIANCE JIO चा 2,999 रुपयांचा प्लॅन

Jio च्या या प्लॅनची किंमत 2,999 रुपये आहे आणि हा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. प्लॅन अंतर्गत तुम्ही दररोज 2.5GB डेटा वापरू शकता. तसेच अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS चा आनंद घेऊ शकता. याशिवाय, प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चे फायदे आहेत. डेटा मर्यादा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग 64Kbps पर्यंत कमी होतो.

एवढेच नाही तर प्लॅनला खास बनवण्यासाठी तुम्ही या काळात ऑफरचा लाभ घेऊ शकता, ज्याद्वारे तुम्हाला 23 दिवसांची अतिरिक्त वैधता आणि 75GB डेटा मिळत आहे.

AIRTELचा 2,999 रुपयांचा प्लॅन 

AIRTELच्या 2,999 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, हा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येते. प्लॅन अंतर्गत अमर्यादित स्थानिक STD आणि रोमिंग कॉल उपलब्ध आहेत. तुम्ही दररोज 2GB डेटा आणि दररोज 100 SMS मिळवू शकता.

याव्यतिरिक्त, प्लॅनच्या इतर फायद्यांमध्ये Apollo 24/7 सर्कल, FASTag वर रु. 100 कॅशबॅक, मोफत Hello Tune आणि मोफत Wynk Music यांचा समावेश आहे. दैनिक SMS मर्यादा संपल्यानंतर, तुम्हाला स्थानिक आणि एसटीडी SMS साठी अनुक्रमे 1 आणि 1.5 रुपये शुल्क द्यावे लागेल. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर, स्पीड 64Kbps पर्यंत कमी होईल.

 दोन्ही कंपन्या समान किंमतीचा प्लॅन ऑफर करत आहेत. परंतु Jio च्या प्लानमध्ये काही खास फायदे उपलब्ध आहेत. ज्यामध्ये 23 दिवसांची अतिरिक्त वैधता आणि 2.5GB डेटा दररोज उपलब्ध आहे. अशा प्रकारे, तुम्हाला प्लॅनमध्ये 388 दिवसांची वैधता मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo