टेलिकॉम विश्वातील दिग्गज AIRTEL आणि JIO या दोन्ही कंपन्यांकडे प्रत्येक श्रेणीत येणारे प्रीपेड प्लॅन्स आहेत. यामध्ये प्रत्येक ग्राहकाच्या सोयीनुसार प्लॅन्स आहेत. दरम्यान दोन्ही कंपन्या जवळपास एकाच किमतीचे प्लॅन्स देतात. AIRTEL आणि JIO कडे 299 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आहे. पण, दोन्ही प्लॅन्समध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्समध्ये मोठी तफावत आहे. बघुयात सविस्तर-
JIO कडे 299 रुपयांचा प्लॅन प्रीपेड प्लॅन आहे. हा प्लॅन एकूण 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 2GB डेटा मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला संपूर्ण वैधतेदरम्यान एकूण 56GB डेटाचा लाभ घेता येईल. त्याबरोबरच, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS देखील तुमच्यासाठी उपलब्ध असतील.
AIRTEL कडे सुद्धा 299 रुपयांचा प्लॅन प्रीपेड प्लॅन आहे. या प्लॅनमध्येही ग्राहकांना एकूण 28 दिवसांची वैधता मिळेल. या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 1.5GB डेटा मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला संपूर्ण वैधतेदरम्यान एकूण 42GB डेटाचा लाभ घेता येईल. त्याबरोबरच, अमर्यादित लोकल, STD कॉलिंग आणि दररोज 100 SMS देखील तुमच्यासाठी उपलब्ध असतील.
अशाप्रकारे, दोन्ही प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांची वैधता मिळते. त्याबरोबरच इतर फायदेही जवळपास सारखेच आहेत. मात्र, JIOकडे AIRTELपेक्षा जास्त डेटाचा लाभ मिळणार आहे. JIO दररोज AIRTEL पेक्षा 500MB डेटा जास्त देणार आहे.