भारतातील सर्वात आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या रिलायन्स Jio आणि भारती Airtel नेहमीच ग्राहकांच्या सोयीसाठी आपले प्लॅन्स अपडेट करत असतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, Airtel आणि Jio दोन्ही कंपन्या 1,199 रुपयांचा प्लॅन ऑफर करतात. दोन्ही कंपन्या हा प्लॅन जवळपास तीन महिने म्हणजेच 84 दिवसांच्या वैधतेसह सादर करतात. जरी दोन्ही प्लॅन्सची किंमत समान असली तरी त्यांच्याद्वारे प्रदान केलेले फायदे वेगळे आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात दोन्ही कंपन्यांच्या प्लॅनमध्ये कोण देतोय अप्रतिम बेनिफिट?
Jio चा 1199 रुपयांचा प्लॅन 84 दिवसांची वैधता देतो. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनची दैनिक डेटा मर्यादा 3GB आहे, वैधतेदरम्यान तुम्हाला एकूण 252GB डेटा मिळतो. तसेच तुम्हाला या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100SMS चा मोफत लाभ देखील मिळेल. याव्यतिरिक्त प्लॅनमध्ये ग्राहकांच्या मनोरंजनाची देखील सोय करण्यात आली आहे. OTT प्लॅटफॉर्म Jio Cinema, Jio TV आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन या प्लॅनमध्ये मोफत उपलब्ध आहे.
Airtel च्या 1199 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये देखील तुम्हाला 84 दिवसांच्या वैधता मिळेल. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2.5GB डेटा मिळतो. म्हणजेच वैधतेदरम्यान, या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 210GB डेटा मिळतो. याव्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये तुम्हाला एकापेक्षा जास्त फायदे मिळत आहेत. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 SMS ची सुविधा मिळत आहे. तसेच, वरील प्लॅनप्रमाणे, कंपनी आपल्या ग्राहकांच्या मनोरंजनाची देखील काळजी घेते. यात OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime आणि Wink वर मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.
दोन्ही प्लॅन्स त्यांच्या संबंधित ठिकाणी उत्कृष्ट फायदे देत आहेत. जर तुम्ही जास्त डेटा वापरत असाल तर तुम्ही Jio प्लॅन खरेदी करू शकता. कारण Jio प्लॅन Airtel प्लॅनपेक्षा जास्त डेटा बेनिफिट ऑफर करतो. याव्यतिरिक्त, तुम्हाला प्लॅनममध्ये उत्तम OTT बेनिफिट्स म्हणजेच मोफत सबस्क्रिप्शन हवे असेल, तर तुम्ही Airtel प्लॅन खरेदी करू शकता. रिचार्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.