जरी Airtel आणि Jioचे अनेक प्रकारचे प्लॅन आहेत, परंतु सर्वात लोकप्रिय प्लॅन्स दररोज 1 GB डेटासह आहेत. तुमच्यापैकी अनेकांनी हे प्लॅन रिचार्ज केले असतील, पण Airtel आणि Jio मधील कोणता प्लॅन सर्वोत्तम आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. लोक दररोज 1 GB डेटासह सर्वाधिक प्लॅन घेतात, कारण शहरातील बहुतेक लोकांच्या घरात Wi-Fi असतो. अशा परिस्थितीत केवळ नंबर चालू ठेवण्यासाठी ते असे प्लॅन्स घेतात. चला तर मग Airtel आणि Jio मधील कोणता प्लॅन दररोज 1GB डेटासह सर्वोत्तम आहे…
हे सुध्दा वाचा : 16GB RAM सह Lenovo Legion Y70 फोन लॉन्च, किंमतही कमी
Jio च्या 1GB दैनिक डेटा प्लॅनची सुरुवातीची किंमत 149 रुपये आहे. या प्लॅनमध्ये 20 दिवसांची वैधता उपलब्ध आहे म्हणजेच तुम्हाला एकूण 20GB डेटा मिळेल. याशिवाय या प्लॅनसह सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगसह दररोज 100 SMS उपलब्ध आहेत. या प्लॅनसह, तुम्हाला Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security ॲप्सचा मोफत प्रवेश मिळेल.
आता Airtel च्या प्लॅनमध्ये 1GB डेटा प्रतिदिन मिळेल, त्याची सुरुवातीची किंमत 209 रुपये आहे. हा प्लॅन 21 दिवसांच्या वैधतेसह येतो म्हणजेच तुम्हाला एकूण 21GB डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये देखील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे आणि दररोज 100 मोफत SMS मिळतील.
जिओच्या 179 रुपयांचा प्लॅन आहे. ज्यामध्ये 24 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये दररोज 1GB डेटा मिळतो. याशिवाय यामध्ये अमर्यादित कॉलिंग आणि जिओ ॲप्स सबस्क्रिप्शनसह दररोज 100 SMS देखील उपलब्ध आहेत.
एअरटेलचा 239 रुपयांचा प्लॅन 24 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्येही दररोज 1GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये 100 SMS उपलब्ध होतील आणि एअरटेल ॲप्सचे सबस्क्रिप्शनही मिळेल.
जिओचा 209 रुपयांचा प्लॅन आहे जो दररोज 1 GB डेटा आणि 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये वरील प्लॅनमध्ये उपलब्ध असलेली सर्व बेनिफिट्स मिळतील.
एअरटेलचा 265 रुपयांचा प्लॅन आहे ज्याची वैधता 28 दिवस आहे. यात अमर्यादित कॉलिंग आणि मेसेजिंग सारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत.