Jio Unlimited 5G Upgrade Voucher: Jio ने आपल्या युजर्सना नवीन वर्षाची भेट म्हणून एक अप्रतिम ऑफर सादर केली आहे. लोकप्रिय टेलिकॉम कंपनी रिलायन्स Jio ने डेटा प्रेमींसाठी अमर्यादित 5G अपग्रेड व्हाउचर लाँच केले आहे. हे व्हाउचर वापरकर्त्यांना संपूर्ण वर्षभर अमर्यादित 5G डेटाचा लाभ देणार आहे. जे युजर्स वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन स्ट्रीमिंग आणि ऑनलाइन स्टडीज करतात इ. युजर्सना अधिक डेटाची आवश्यकता असते. हे व्हाउचर खास त्यांच्यासाठी आहे.
महत्त्वाचे म्हणजे Jio ची ही ऑफर युजर्सना अत्यंत कमी किमतीत संपूर्ण वर्षासाठी अमर्यादित 5G डेटा ऑफर करत आहे. जाणून घेऊयात Jio ऑफर-
Jio युजर्ससाठी अनेक अमर्यादित 5G व्हाउचर घेऊन आले आहे. यामध्ये एका वर्षासाठी उपलब्ध असलेल्या अमर्यादित 5G व्हाउचरची किंमत 601 रुपये आहे. तर, दुसरे व्हाउचर केवळ 51 रुपयांचे आहे. लक्षात घ्या की, 51 रुपयांचे Jio Unmilited 5G अपग्रेड व्हाउचर विशेषतः 299 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसाठी सादर करण्यात आले आहे.
Jio चा 601 रुपयांच्या व्हाउचरद्वारे वापरकर्त्यांना एका वर्षासाठी अमर्यादित 5G डेटा दिला जाईल. मात्र, यासाठी वापरकर्त्यांकडे दररोज किमान 1.5GB डेटा असलेला प्लॅन ऍक्टिव्ह असणे आवश्यक आहे. लक्षात घ्या की, यामध्ये 199, 239, 299, 319, 329, 579, 666, 769 आणि 899 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे.
601 रुपयांचा प्लॅन केवळ तुमच्यासाठीच नाही तर गिफ्ट म्हणूनही बनवण्यात आला आहे. तुम्ही ते थेट My Jio ॲपद्वारे तुमच्या कुटुंबासाठी किंवा मित्रांसाठी खरेदी करू शकता. मात्र, गिफ्ट करण्यापूर्वी तुमचा मित्र किंवा प्राप्तकर्ता पात्र प्लॅन्ससह असल्याची खात्री करून घ्या. जेणेकरून ते अमर्यादित 5G डेटाचा आनंद घेण्यास सक्षम असतील. रिचार्ज खरेदी करण्यासाठी क्लिक करा.
या व्यतिरिक्त, Jio एक छोटा 5G अपग्रेड प्लॅन देखील ऑफर करते. या प्लॅनच्या किमती 51 रुपये आहे. 51 रुपयांच्या व्हाउचरची वैधता एक महिन्याची आहे. तर, 101 रुपये आणि 151 रुपयांचे इतर डेटा व्हाउचर देखील आहेत. 101 रुपयांच्या प्लॅनची वैधता दोन महिने आणि 151 रुपयांच्या प्लॅनची वैधता तीन महिन्यांची आहे.