Jio च्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्लॅन्स उपलब्ध आहेत. अनेक प्लॅन्स दैनंदिन डेटा आणि भारी बेनिफिट्सह येतात. जे लोक घरून काम करतात, त्यांच्यासाठी हा दैनंदिन मोबाइल डेटा कमी पडतो. अशा परिस्थितीत, कंपनी वापरकर्त्यांना अमर्यादित 5G डेटा देखील प्रदान करते. अमर्यादित डेटासह, वापरकर्त्यांना अनेक महत्त्वाचे बेनिफिट्स मिळतात. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला 1,000 रुपयांअंतर्गत असलेल्या अमर्यादित 5G डेटा प्लॅन्सबद्दल माहिती देणार आहोत.
अमर्यादित 5G डेटासह सर्वात स्वस्त प्लॅनची किंमत 198 रुपये आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा दररोज मिळतो. त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंगसह दररोज 100 मोफत SMS मिळतील. एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये Jio ॲप्सचे सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. हा प्लॅन एकूण 14 दिवसांच्या वैधतेसह येतो.
या प्लॅनमध्ये सुद्धा अमर्यादित 5G डेटा देखील उपलब्ध आहे. या डेटासह तुम्ही तुमचे काम अगदी सहज दिवसभर करण्यास सक्षम असाल. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा आणि बरेच काही मिळते. त्याबरोबरच, यात अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100SMS मिळणार आहेत. या प्लॅनची वैधता एकूण 28 दिवसांची आहे. OTT बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये SonyLIV आणि Zee5 चे सबस्क्रिप्शन देण्यात आले आहे.
या प्लॅनची वैधता 84 दिवसांपर्यंत उपलब्ध आहे. 949 रुपयांच्या प्लॅनमध्ये देखील तुम्हाला अमर्यादित कॉलिंगसह दररोज 100SMS उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा देखील उपलब्ध आहे. यासह तुम्ही तुमचे काम निश्चितपणे करू शकता. यामध्ये OTT बेनिफिट्सदेखील उपलब्ध आहेत, जे Disney+ Hotstar सबस्क्रिप्शनसह येतात. या स्बक्रिप्शनची वैधता देखील 84 दिवसांची आहे.