मध्य प्रदेशातील महाकालेश्वर मंदिर आणि श्री महाकाल महालोक येथे जिओ ट्रू 5जी सेवा सुरू केली आहे. लाखो शिवभक्तांना आता कोणत्याही अतिरिक्त शुल्का शिवाय या सेवेचा लाभ घेता येणार आहे. बुधवारी एका कार्यक्रमात मध्य प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जिओ ट्रू 5जी आणि जिओ ट्रू 5जी वाय फाय सेवा सुरू केली.
कार्यक्रमाच्या दरम्यान, जिओने 5G चे अनेक फायदे सूचीबद्ध केले. तसेच आरोग्य क्षेत्रात 'जिओ कम्युनिटी क्लिनिक' आणि एआर-व्हीआर डिव्हाइस जिओ-ग्लासचे डेमो केले. त्याबरोबरच, या माध्यमातून मध्य प्रदेशातील लोकांच्या जीवनात क्रांतिकारी बदल कसा होईल हे सांगितले.
यावेळी बोलताना मध्यप्रदेशचे माननीय मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, "उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर आणि श्री महाकाल महालोक ही धार्मिक स्थळे आहेत. भगवान महांकालाचा आशीर्वाद घेण्यासाठी देशभरातून आणि जगभरातून लाखो भाविक दररोज या मंदिराला भेट देतात. मध्य प्रदेश आणि तेथील लोकांना जिओ च्या ट्रू 5जी सेवेचा खूप फायदा होईल."
पुढे ते म्हणाले, "मला कळविण्यात आनंद होत आहे की, 30 दिवसांपेक्षा कमी कालावधीत म्हणजेच जानेवारी 2023 मध्ये इंदूर देखील जिओ ट्रू 5जी नेटवर्कशी जोडले जाईल. जिओ ट्रू 5G सामान्य माणूस, विद्यार्थी, व्यापारी, IT, आरोग्य व्यावसायिकांसह कृषी, शिक्षण, वैद्यकीय, माहिती तंत्रज्ञान आणि उत्पादन यासारख्या क्षेत्रांमध्ये नवीन संधी आणि अतिरिक्त रोजगारांसह बदल घडवून आणेल. सामान्य लोक आणि सरकार एकमेकांशी रिअल टाइममध्ये कनेक्ट होण्यासाठी 5G हा आधार असेल. शेवटच्या उपेक्षित व्यक्तीपर्यंत सरकारी योजना पोहोचण्यासाठी 5G देखील उपयुक्त ठरेल."
या प्रसंगी टिप्पणी करताना, जिओच्या प्रवक्त्याने सांगितले की, "आम्हाला मध्य प्रदेशातील पहिला जिओ ट्रू 5G कॉरिडॉर असलेल्या श्री महाकाल महालोक कडून जिओ ट्रू 5G सेवा सुरू करण्याचा विशेषाधिकार मिळाला आहे. लवकरच,ट्रू 5G नेटवर्क मध्य प्रदेशात वेगाने पसरेल. मध्य प्रदेशात जिओ हे एकमेव 5G नेटवर्क आहे. प्रत्येक नागरिकाला या तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा यासाठी जिओचे अभियंते चोवीस तास काम करत आहेत. डिजिटायझेशन पुढे नेण्यात पूर्ण सहकार्य केल्याबद्दल आम्ही मध्यप्रदेश सरकारचे आभारी आहोत".