digit zero1 awards

Jio True 5G सेवा 20 नवीन शहरांमध्ये सुरू, महाराष्ट्रातील दोन शहरांचा समावेश

Jio True 5G सेवा 20 नवीन शहरांमध्ये सुरू, महाराष्ट्रातील दोन शहरांचा समावेश
HIGHLIGHTS

Jio True 5G सेवा एकाच वेळी नव्या 20 शहरांमध्ये सुरु

महाराष्ट्रातील दोन शहरांचा समावेश

चंद्रपूर, इचलकरंजीमधील JIO ग्राहक आता 5G सेवेचा लाभ घेऊ शकतील.

दूरसंचार कंपनी रिलायन्स JIO ने मंगळवारी देशातील आणखी 20 शहरांमध्ये आपली हाय-स्पीड 5G सेवा सुरू केली. कंपनीने 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 20 शहरांमध्ये Jio True 5G सेवा सुरू केली आहे. नवीन लॉन्चसह, Jio 5G सेवा आता देशभरातील 277 शहरांमध्ये उपलब्ध आहेत. यादीत महाराष्ट्रातील दोन शहरांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर, इचलकरंजीमधील JIO ग्राहक आता 5G सेवेचा लाभ घेऊ शकतील.

हे सुद्धा वाचा : POCO ने भारतात लाँच केला स्वस्त स्मार्टफोन, 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत

या शहरांमध्ये JIO True 5G सेवा सुरु केली. 

JIO ने मंगळवारी 20 नवीन शहरांमध्ये हायस्पीड इंटरनेट सुविधा सुरू केली आहे. 

– आसाममधील चार शहरे- बोंगाईगाव, उत्तर लखीमपूर, शिवसागर, तिनसुकिया. – बिहारमधील दोन शहरे – भागलपूर, कटिहार. – गोव्याचे मुरगाव. – दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव. – गुजरातचे गांधीधाम. – झारखंडमधील तीन शहरे – बोकारो स्टील सिटी, देवघर, हजारीबाग. – कर्नाटकातील रायचूर. – मध्य प्रदेशातील सतना. – महाराष्ट्रातील दोन शहरे – चंद्रपूर, इचलकरंजी. – मणिपूरचे थौबल. – उत्तर प्रदेशातील तीन शहरे – फैजाबाद, फिरोजाबाद, मुझफ्फरनगर.

 नवीन लॉन्च झालेली ही ट्रू 5G शहरे महत्त्वाची पर्यटन आणि वाणिज्य स्थळे तसेच आपल्या देशातील प्रमुख शैक्षणिक केंद्रे आहेत. Jio च्या True 5G सेवा लॉन्च केल्यामुळे, क्षेत्रातील वापरकर्त्यांना केवळ सर्वोत्तम दूरसंचार नेटवर्कमध्येच प्रवेश मिळणार नाही तर तसेच ई-गव्हर्नन्स, शिक्षण, ऑटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, गेमिंग, हेल्थकेअर, कृषी, आयटी आणि एसएमई या क्षेत्रात अनंत संधी आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo