Jio वेगाने आपली ट्रू 5G सर्व्हिस रोलआउट करत आहे. मंगळवारी 34 नवीन शहरे Jio True 5G नेटवर्कशी जोडली गेली. Jio च्या True 5G शी जोडलेल्या शहरांची संख्या आता एकूण 225 झाली आहे. तामिळनाडूमध्ये सर्वाधिक 8 शहरे 5G शी जोडलेली आहेत. याशिवाय आंध्र प्रदेशमधून 6 शहरे, आसाम आणि तेलंगणातील प्रत्येकी तीन, छत्तीसगड, हरियाणा, महाराष्ट्र, ओडिशा आणि पंजाबमधील प्रत्येकी दोन शहरे जोडली गेली आहेत. बिहारमधील गया, राजस्थानमधील अजमेर, कर्नाटकातील चित्रदुर्ग आणि उत्तर प्रदेशातील मथुरा शहराचाही या यादीत समावेश आहे.
महाराष्ट्राच्या दोन शहरांमध्ये म्हणजेच जळगाव आणि लातूर या शहरांत Jio True 5G सर्व्हिस लाँच करण्यात आली आहे.
हे सुद्धा वाचा : Samsung Galaxy Unpacked 2023: या वर्षीच्या सर्वात मोठ्या इव्हेंटमध्ये 'हे' जबरदस्त डिवाइस होणार लाँच
यापैकी बहुतांश शहरांमध्ये 5G सेवा सुरू करणारी रिलायन्स जिओ ही पहिली आणि एकमेव ऑपरेटर ठरली आहे. या शहरांतील जिओ वापरकर्त्यांना जिओ वेलकम ऑफर अंतर्गत आमंत्रित केले जाईल. आमंत्रित वापरकर्त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 1Gbps+ वेगाने अमर्यादित डेटा मिळेल.
या प्रसंगी Jio च्या प्रवक्त्याने सांगितले की, “आम्ही 34 नवीन शहरांमध्ये Jio true 5G लाँच करण्यास अत्यंत उत्सुक आहोत. जिओने बीटा ट्रायल लाँच झाल्यानंतर अवघ्या 120 दिवसांत 225 शहरांमध्ये लाँच करण्याचा विक्रम केला आहे. आम्ही देशभरात ट्रू 5G रोलआउटची गती वाढवली आहे आणि डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण देश Jio true G शी जोडला जाईल.