Jio True 5G: महाराष्ट्रातील नवीन दोन शहरांमध्ये सेवा लाँच, तुमचे शहर आहे का यादीत?
Jio True 5G सुविधेचा 16 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 41 शहरांमध्ये विस्तार
या शहरांमधील Jio वापरकर्त्यांना Jio वेलकम ऑफर अंतर्गत 1 Gbps+ वेगाने अमर्यादित डेटाचा अनुभव घेण्यासाठी आमंत्रित केले जाईल.
दूरसंचार कंपनी रिलायन्स Jio ने मंगळवारी म्हणजेच 21 मार्च रोजी एकाच वेळी 41 शहरांमध्ये आपली हाय स्पीड इंटरनेट सेवा Jio True 5G सुरू केली आहे. नवीन लॉन्चसह जिओचे 5G नेटवर्क आता देशातील 406 शहरांमध्ये पोहोचले आहे. कंपनीने आज आपल्या Jio True 5G सुविधेचा 16 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 41 शहरांमध्ये विस्तार केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन शहरांचा देखील समावेश आहे.
हे सुद्धा वाचा : Dynamic Island सारख्या फीचर्ससह REALMEचा नवीन फोन लाँच, अगदी बजेटमध्ये आहे किंमत
कोणत्या शहरांचा यादीत समावेश
नव्याने Jio True 5G सेवा लाँच झालेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील दोन शहरांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील भंडारा आणि वर्धा या दोन शहरांमध्ये ही सेवा अखेर लाँच करण्यात आली आहे. याशिवाय, मध्य प्रदेशातील बैतुल, देवास, विदिशा. हरियाणातील फतेहाबाद, गोहाना, हांसी, नारनौल, पलवल. आंध्र प्रदेशातील अदोनी, बडवेल, चिलाकालुरिपेट, गुडीवाडा, कादिरी, नरसापूर, रायचोटी, श्रीकालहस्ती, ताडेपल्लीगुडेम, रॉबर्ट्सनपेटा, झारकानपेटा, गोहरणपेटा मडगाव.
हिमाचल प्रदेशचे पोंटा साहिब, जम्मू आणि काश्मीरचे राजौरी. केरळचे कन्हानगड, नेदुमनगड, तालिपरंबा, थलासेरी, थिरुवल्ला. मिझोरामचे लुंगले, ओडिशाचे बियासनगर, रायगडा. पंजाबची काही शहरे आणि त्रिपुरातील रानीपेठ, थेनी अल्लिनगरम, उधगमंडलम, वानियाम्बडी आणि कुमारघाट इ. शहरांमध्ये Jio True 5G सेवा लाँच झालेली आहे.
आजपासून या 41 शहरांमधील Jio वापरकर्त्यांना Jio वेलकम ऑफर अंतर्गत 1 Gbps+ वेगाने अमर्यादित डेटाचा अनुभव घेण्यासाठी आमंत्रित केले जाईल. जिओने डिसेंबर 2023 पर्यंत देशातील प्रत्येक गाव/शहर कव्हर करण्याची योजना आखली आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile