Airtel आणि VI सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी रिलायन्स JIO सतत नवनवीन प्लॅन्स आणत असते. Jio कडे परवडणाऱ्या किमतीत अनेक प्रीपेड प्लॅन्स आहेत, जे भरपूर डेटा आणि कॉलिंग फायदे देतात. या लेखात आम्ही तुम्हाला रिलायन्स JIOच्या अशा 3 प्रीपेड प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत 300 रुपयांपेक्षा कमी आहे. या सर्व प्लॅनमध्ये तुम्हाला डेटा आणि कॉलिंगसह 28 ते 30 दिवसांची वैधता मिळेल.
हे सुद्धा वाचा : ही अप्रतिम ऑफर प्रथमच ! SAMSUNGच्या महागड्या फोनसाठी 'Buy Now, Pay Later' ऑप्शन लाँच
हा प्लॅन त्यांच्यासाठी आहे ज्यांना अधिक डेटाची गरज आहे, 299 रुपयांमध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा आणि 28 दिवसांची वैधता मिळते. म्हणजेच तुम्हाला एकूण 56GB डेटाचा लाभ मिळेल. इतर प्लॅन्सप्रमाणे, या प्लॅनमध्ये Jio ऍप्स (JioTV, JioCinema, JioSecurity, JioCloud) सोबत अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 SMS चे बेनिफिट मिळेल.
हा प्लॅन अशा वापरकर्त्यांसाठी आहे, ज्यांना दैनिक मर्यादेशिवाय डेटा हवा आहे. 296 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 30 दिवसांसाठी 25GB डेटा मिळतो. तुम्ही हा डेटा कधीही वापरू शकता. प्लॅनमध्ये Jio ऍप्स म्हणजेच JioTV, JioCinema, JioSecurity, JioCloud सोबत अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS चे बेनिफिट मिळणार आहे.
रिलायन्स जिओचा हा प्लॅन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करतो, तुम्हाला हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1GB डेटा मिळतो, म्हणजेच तुम्हाला यामध्ये एकूण 28GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतील. त्याबरोबरच, Jio ऍप्स म्हणजेच JioTV, JioCinema, JioSecurity, JioCloud चे मोफत ऍक्सेस मिळेल.