आज 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत राम मंदिराचे उदघाटन करण्यात येणार आहे. या निमित्त संपूर्ण देशात जिकडे तिकडे एकच जल्लोष सुरु आहे. रामभक्तांनी देशभरात अगदी धुमाकूळ घातला आहे, सगळीकडे वातावरण अगदी राममय झाले आहे. भाविकांनी या कार्यक्रमासाठी अयोध्येत मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे. विशेष म्हणजेच यानिमित्त Jio ने देखील आपल्या युजर्ससाठी अनेक घोषणा आणि सुविधा जाहीर केल्या आहेत.
होय, रिलायन्स Jioने प्रभू रामाच्या अभिषेक प्रसंगी राम भक्तांना एक अप्रतिम भेट दिली आहे. Jio ने याप्रसंगी अनेक विशेष सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे अयोध्येत येणाऱ्या भाविकांना कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत कोणतीही अडचण येणार नाही. दिनविशेषनिमित्त Jio युजर्सना मिळणाऱ्या सुविधा पुढीलप्रमाणे आहेत:
अयोध्येला जाणाऱ्या भाविकांसाठी Jio चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. त्याबरोबरच, अनेक ठिकाणी ‘मे आय हेल्प यू डेस्क’ सुरू करण्यात येणार आहे. एवढेच नाही तर, पाणी व अल्पोपाहारची सेवा सुरू करण्यात येणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, रिलायन्स रिटेल स्टोअर्सच्या मदतीने अयोध्येतील यात्रेकरूंना पाणी पुरवले जाईल. याव्यतिरिक्त, दूरदर्शनच्या मदतीने प्राण प्रतिष्ठा सोहळा Jio TV, Jio TV Plus आणि Jio News वर लाइव्ह दाखवले जाईल, असे Jio ने जाहीर केले आहे.
भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी Jio ने अयोध्येत या प्रसंगी हायस्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. अयोध्येत Jio ट्रू 5G आणि स्टँडअलोन 5G नेटवर्क सुधारले जाईल. याशिवाय, जिओ अयोध्येत अतिरिक्त टॉवर्स बसवणार आहे, जेणेकरून संपूर्ण शहरात उत्कृष्ट कॉलिंग आणि डेटा सेवा मिळेल. याशिवाय अनेक सेल ऑन व्हील वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत.
एवढेच नाही तर, अयोध्येत कॉलिंग किंवा डेटा ऍक्सेस करण्यात काही अडचण आल्यास ते टाळण्यासाठी फास्ट्रॅक तक्रार सुविधा देखील सुरू करण्यात आली आहे.