मनोरंजन होणार दुप्पट ! 200 रुपये अधिक भरून मिळतील 14 OTT सबस्क्रिप्शन, Jio ची खास ऑफर

Updated on 06-Dec-2022
HIGHLIGHTS

JIO चा 699 रुपयांचा प्लॅन

200 रुपये अधिक भरून मिळतील 14 OTT सबस्क्रिप्शन

अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 550 हून अधिक डिमांड टीव्ही चॅनेलचा प्रवेश मिळतो.

टेलिकॉम कंपन्या तुम्हाला फक्त मोबाईल सेवाच देत नाहीत तर ब्रॉडबँड सेवा देखील देतात. जिओच्या ब्रॉडबँड सेवेमध्ये तुम्हाला अनेक आकर्षक प्लॅन्स मिळतील. कंपनी प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही ब्रॉडबँड सेवा देते. जिओ फायबरच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक आकर्षक प्लॅन्स आहेत, त्यापैकी एक 699 रुपयांचा प्लॅन होय. 

हे सुद्धा वाचा : Blaupunkt BTW20: HD साउंडसह मिळेल 14 तासांचा बॅटरी बॅकअप , बघुयात किंमत

या प्लॅनमध्ये नेहमीच्या बेनिफिट्ससह ग्राहकांना OTT फायदे देखील मिळू शकतात, ज्यासाठी तुम्हाला थोडे जास्त पैसे खर्च करावे लागतील. हे सर्व तुम्हाला अगदी वाजवी दरात मिळेल. जिओ फायबरच्या या प्लॅनसह, वापरकर्त्यांना तब्बल 14 OTT ऍप्सवर प्रवेश मिळतो.

जिओचा हा प्लॅन पोस्टपेड ग्राहकांसाठी आहे. यामध्ये ग्राहकांना 14 OTT प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळतो, ज्यासाठी वापरकर्त्यांना 200 रुपये अधिक भरावे लागतील. या संपूर्ण प्लॅनसाठी तुम्हाला 899 रुपये खर्च करावे लागतील. या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना 100Mbps च्या स्पीडने अमर्यादित डेटा मिळतो. तसेच यामध्ये तुम्हाला अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 550 हून अधिक डिमांड टीव्ही चॅनेलचा प्रवेश मिळतो.

या OTT प्लॅटफॉर्मचे ऍक्सेस मिळेल.

तुम्ही हा प्लॅन 3 महिने, 6 महिने आणि एक वर्षाच्या बिलिंग सायकलवर खरेदी करू शकता. यामध्ये यूजर्सना Disney+ Hotstar, Sony LIV, ZEE5, Voot Select, Voot Kids, SunNXT, Hoichoi, Discovery+, Universal+, ALTBalaji, Eros Now, Lionsgate Play, ShemarooMe, Jio Cinema आणि Jio Saavn वर प्रवेश मिळेल.

जिओचा हा प्लॅन नवीन ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला मोफत सेट टॉप बॉक्सही मिळेल. तुम्ही हा प्लॅन Jio Fiber च्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता. लक्षात ठेवा की, 899 रुपयांव्यतिरिक्त तुम्हाला GST  देखील भरावा लागेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :