Special Offer! Jioकडून iPhone 15 साठी खास ऑफर, 6 महिन्यांसाठी रिचार्ज मिळेल अगदी Free

Special Offer! Jioकडून iPhone 15 साठी खास ऑफर, 6 महिन्यांसाठी रिचार्ज मिळेल अगदी Free
HIGHLIGHTS

टेलिकॉम दिग्गज कंपनी Jio ने iPhone 15 साठी एक विशेष ऑफर आणली आहे.

Jio ऑफर iPhone 15 खरेदी केल्यानंतर 72 तासांच्या आत सक्रिय (Active) होईल.

कोणत्या ग्राहकांना मिळेल Jioची ही विशेष ऑफर?

लेटेस्ट iPhone 15 गेल्या आठवड्यात जागतिक बाजारात लाँच करण्यात आला आहे. त्याबरोबरच, या डिव्हाइसची विक्रीदेखील अधिकृत वेबसाइटसह ऑनलाइन शॉपिंग साइटवर थेट झाली आहे. या डिवाइसवर ऑफर्सचा वर्षाव तर सुरु आहेच. पण, टेलिकॉम दिग्गज कंपनी Jio ने iPhone 15 साठी एक विशेष ऑफर आणली आहे, ज्या अंतर्गत ग्राहकांना फोन खरेदीवर तब्बल 2,394 रुपयांचा फायदा मिळेल. Jio ने आणलेल्या विशेष ऑफरबद्दल सविस्तर माहिती बघुयात.

कोणत्या ग्राहकांना मिळेल Jio ऑफर?

reliance jio

Jio ऑफर देखील डिवाइसची विक्री सुरु झाल्यापासून म्हणजेच 22 सप्टेंबरपासून लाईव्ह झाली आहे. ही ऑफर नवीन प्रीपेड ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. तर, नॉन-जिओ ग्राहक कंपनीचे नवीन सिम खरेदी करून किंवा मोबाइल नंबर पोर्ट करून या ऑफरचा लाभ घेऊ शकतील. आता बघुयात या ऑफरमध्ये तुम्हाला कोणते फायदे मिळतील.

Jio ऑफर

Jioच्या मते, रिलायन्स डिजिटल, Jio मार्ट आणि रिलायन्स रिटेल स्टोअरमधून iPhone 15 खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सहा महिन्यांसाठी 399 रुपयांचा फ्री रिचार्ज प्लॅन दिला जाईल. या अंतर्गत ग्राहकांना एकूण 2,394 रुपयांची बचत करता येणार आहे. 399 रुपयांच्या प्लॅन बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या पॅकमध्ये दररोज 3GB डेटा आणि 100SMS मिळणार आहेत. याशिवाय, अमर्यादित कॉलिंगदेखील मिळणार आहे. Jio ऍप्सचे सब्स्क्रिप्शनदेखील या प्लॅनसह उपलब्ध आहे.

Jio ऑफर iPhone 15 खरेदी केल्यानंतर 72 तासांच्या आत सक्रिय (Active) होईल. ही माहिती ग्राहकांना SMS किंवा E-mail द्वारे मिळेल.

iphone 15 series

iPhone 15

iPhone 15 ची किंमत 79,990 रुपयांपासून सुरू होते. या डिव्हाइसवर बंपर बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. याशिवाय, फोनवर EMI ऑप्शन उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.1 इंच लांबीचा सुपर रेटिना डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. यात डायनॅमिक आयलँड फिचर देखील मिळेल. फोनमध्ये A16 बायोनिक चिपसेट आहे. फोटोग्राफीसाठी, डिव्हाइसमध्ये 48MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, तर सेल्फीसाठी 12MP कॅमेरा आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo