रिलायन्स Jio ही देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. त्याच्या पोर्टफोलिओमध्ये प्रीपेड प्लॅन्स आहेत, जे सुपर फास्ट डेटासह अमर्यादित कॉलिंग आणि SMS सारखे फायदे देतात. यापैकी एक प्रीपेड पॅक देखील आहे ज्यामध्ये प्रसिद्ध OTT ॲप सबस्क्रिप्शन दिले जात आहे. जर तुम्ही हा प्लॅन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, बघुयात या प्लॅनची किंमत आणि सर्व लाभ-
कथित Jio च्या प्रीपेड प्लॅनची किंमत 1029 रुपये आहे. हा पॅक रिचार्ज केल्यावर, तुम्हाला दररोज 2GB डेटा म्हणजेच वैधते दरम्यान एकूण 168GB डेटा मिळणार आहे. तसेच, या प्लॅनमध्ये दररोज 100SMS ची सुविधा देखील देण्यात आली आहे. त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे.
याशिवाय, वर सांगितल्याप्रमाणे, या प्रीपेड प्लॅनमध्ये युजरच्या मनोरंजनाची सोय देखील करण्यात आली आहे. होय, प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video च्या मोबाइल एडिशनचे सबस्क्रिप्शन यात मोफत उपलब्ध आहे. त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये Jio टीव्ही, सिनेमा आणि क्लाउडचे प्रवेश देखील सामाविष्ट केले आहे. वैधतेबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनची वैधता एकूण 84 दिवसांची आहे. Jio चा 1029 रूपयांचा प्लॅन तुम्ही Jio अधिकृत वेबसाईट आणि मोबाइल ॲपद्वारे देखील रिचार्ज करू शकता.
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, टेलिकॉम दिग्गज Jio ने अलीकडेच त्यांच्या वापरकर्त्यांसाठी स्वातंत्र्यदिनी ऑफर आणली होती. या ऑफर अंतर्गत आता वापरकर्त्यांना Jio Fibre कनेक्शन घेण्यासाठी इंस्टॉलेशन शुल्क भरावे लागणार नाही. वापरकर्ते कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय कनेक्शन मिळवू शकतात. लक्षात घ्या की, Jio चे हे कनेक्शन घेतल्यावर 1000 रुपये इन्स्टॉलेशन चार्ज असतो. मात्र, स्वातंत्र्यदिनाच्या ऑफरसह तुम्हाला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही.